बार मधील बिलाच्या वादातून बार कर्मचाऱयांनी केली मारहाण दोन ग्राहक गंभीर जखमी…


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

बिबवेवाडी परिसरातील S.K.बियर बार मधील कर्मचारी व म्यानेजर यांनी बिलाच्या वादातून कर्मचाऱ्यांसह गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांनी तीन जणांना रस्त्यावर बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार बिबवेवाडी परिसरात घडला.
बिबवेवाडी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते…

याप्रकरणी कामगारांसह इतरांचा पोलिस शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन तरुण येथील एस. के. बारमध्ये दारू पिण्यास गेले होते. दारू पितानाच त्यांनी थोडा गोंधळ घालण्यास सुरुवात केली. गोंधळानंतर कर्मचाऱ्यांनी त्यांना शांत राहण्यास सांगितले होते. दरम्यान, तरुणांशी बिलावरून वाद घातला. त्यानंतर बारमधील कामगारांनी तीन तरुणांना बाहेर बोलावले. नंतर त्यांना लाकडी दांडके, पट्टा तसेच इतर हत्याराने मारहाण करण्यास सुरुवात केली.

Advertisement

या कामगारांसोबत अप्पर इंदिरानगरमधील इतर मुलांनीही सहभाग घेत त्यांना बेदम मारहाण केली. या बेदम मारहाणीत तरुण रस्त्यावर कोसळल्यानंतर त्यांना मारत असल्याचा थरकाप उडविणारे व्हिडीओ व्हायरल झाले. त्यानंतर हा प्रकार समोर आला. दरम्यान, यात दोन तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत बिबवेवाडी पो स्टे २०/२०२५, भा. न्या.सं. कलम १०९,१८९ (२),१८९ (४),१९१(२),१६१ (३),१९०,१२७ (२), ११५ (२) सह महा. पोलीस अधि. कलम ३७ (१) सह १३५पुढील तपास बिबवेवाडी पोलिस करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!