पुणे महानगर पालिकेचा निसर्गाशी खेळ “महापालिका अधिकाऱ्याचे जाणीव पूर्वकदुर्लक्ष..


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

पुणे शहरात डोंगर उतारावरून पावसाचे पाणी प्रवाहित होण्या साठी नाले मोठ्या प्रमाणत अस्तित्वात होते .परंतु महापालिकेच्या अभद्र कारभारामुळे नाले बांधकाम व्यवसायिकांच्या फायद्या साठी 40%नाले बुजवण्यात आले. पुणे महानगर पालिकेतील बांधकाम विभागाने शहरातील नदी , नाले, डोंगर यांचे अस्तित्व ठेवले नाही.सर्रास नैसर्गिक प्रवाहित होणाऱ्या नाल्यात बांधकामास परवानगी देऊन किव्हा अनधिकृत पणे नाल्यात भराव टाकून बुजवले. पुणे शहरातील पर्यावरणाचे अतोनात नुस्कान केले असल्याचे दिसत आहे.

शहरातील नैसर्गिक नाले, ओढे बुजवून त्यावर अतिक्रमण करणे तसेच बांधकाम प्रकल्प उभारणे हे प्रकार पुणे शहरात आता नवे राहिले नाहीत. याचे परिणाम शहराला भयंकर स्वरुपात भोगावे लागत आहेत. शहरात एक मोठा पाऊस झाला तरी रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त होते. यामध्ये काही नागरिकांना जीवदेखील गमवावा लागला आहे. नाले, ओढ्यांचा नैसर्गिक प्रवाह बदल्याने पूरजन्य परिस्थितीमध्ये ओढ्यालगत राहणाऱ्या अनेक नागरिकांचे संसार पाण्यासोबत वाहून गेले. त्यामुळे अनेक कुंटुंबे उध्वस्त झाली आहेत. अशा गंभीर घटना घडल्यानंतरही महापालिका प्रशासनाला अद्याप जाग आली नसल्याचे अनेक उदाहरणांवरुन स्पष्ट होत आहे.

सर्व्हे क्रमांक ४२ या भागात वडगाव बुद्रुक सिंहगड महाविद्यालय येथील ओढा अनधिकृतपणे बुजवून अतिक्रमण केल्याची पहिली तक्रार २६ ऑगस्ट २०२२ रोजी रिपब्लिकन बहुजन आघाडीचे अध्यक्ष किशोर कांबळे, महासचिव अॅड. आकाश साबळे यांनी पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाचे प्रमुख प्रशांत वाघमारे यांच्याकडे केली होती. त्यानंतर सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा केला जात आहे. तसेच हा भाग झोन क्रमांक दोनमध्ये येतो. त्यामुळे झोनच्या प्रमुखांकडेदेखील याबाबत कांबळे यांनी तक्रार केली होती. परंतु अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, असे कांबळे यांनी सांगितले

Advertisement

नैसर्गिक जलस्त्रोत बुजविल्याने मुख्य ओढे आणि मुळा-मुठा नदीला जाणाऱ्या प्रवाहावर परिणाम झाला आहे. पावसाचे पाणी नैसर्गिक मार्गाने जाण्याऐवजी वाट मिळेल त्या मार्गाने उताराच्या दिशेने वाहते. परिणामी, थोडा मोठा पाऊस पडला तरी शहरात पूरसदृश्य परिस्थिती अनुभवायला मिळते. वडगाव बुद्रुक भागात प्राथमिक शाळा, कॉलेज, लोकवस्ती असल्यामुळे नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. पाण्याचा मोठा प्रवाह संरक्षक भिंतींसारख्या कमकुवत बांधकामांना धडका देतो. त्यामुळे या भिंती, इमारतींचे काही भाग कोसळणे किंवा रस्ते खचण्याचे प्रकार समोर येत आहेत. हे सर्व प्रकार रोखण्यासाठी आता ओढा बुजविणाऱ्या भूमाफियांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. तसेच या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करण्यात यावी. बुजवण्यात आलेला ओढ्यात भराव टाकण्यात आलेला राडारोडा काढून नैसर्गिक ओढा पूर्वीसारखा नैसर्गिकरित्या वाहता करावा. अन्यथा राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार केली जाईल. तसेच पुढील कार्यवाही झाली नाही तर रिपब्लिकन बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू, असा इशारा कांबळे यांनी दिला आहे.

वडगाव बुद्रुकमध्ये असलेल्या सर्व्हे क्रमांक ४२ येथील ओढा आणि तलाव बुजविल्याच्या तक्रारीनुसार संबंधित ठिकाणी पाहणी केली जाईल. असे काही आढळून आल्यास योग्य कारवाई केली जाईल. तसेच नैसर्गिक ओढा आणि तळे पूर्ववत करण्यात येईल. संबंधित अधिकाऱ्यांना पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!