शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसात झाडाची फांदी डोक्यात पडून तरुणाचा मृत्यू….
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
झाडाची फांदी डोक्यात पडल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी झालेल्या मुसळधार पावसात रात्री घडली. बिबवेवाडीतील अप्पर ओटा परिसरात हा प्रकार घडला.
l
योगेश ज्ञानदेव वानेरे (वय २९, रा.सध्या रा. पोकळे वस्ती, बिबवेवाडी, मूळ रा. वाघुड, ता. मलकापूर, जि. बुलढाणा) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास योगेश वानेरे आणि त्यांचे मित्र सुमीत बगाडे ओटा वसाहतीतील महादेव मंदिराजवळ गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी झाडाची मोठी फांदी तुटली आणि योगेश यांच्या डोक्यात पडली. फांदी डोक्यात कोसळल्याने योगेश गंभीर जखमी झाले होते. त्यांनी तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. योगेश यांचे मित्र सुमीत या घटनेत बचावले. या घटनेची माहिती परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त अश्विनी राख, बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर यांनी घटनास्थळी भेट दिली.



