उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीवर गंभीर आरोप, पुण्यात ४० एकर सरकारी जमिन कवडीमोल भावात विकत घेतल्याचा मोठा आरोप..
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस…
पुणे | ७ नोव्हेंबर २०२५
पुण्यातील उच्चभ्रू कोरेगाव पार्क व कोंढवा परिसरातील सुमारे ४० एकर सरकारी जमीन कवडीमोल दरात विकत घेतल्याच्या आरोपावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या भागीदारीतील “अमेडिया एन्टरप्रायझेस” या कंपनीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
या प्रकरणी मुद्रांक शुल्क अधिकारी संतोष अशोक हिंगाणे यांनी बावधन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अमेडिया कंपनीचे दुसरे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील, शितल किशनचंद तेजवानी आणि रवींद्र बाळकृष्ण तारू यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, संबंधित कंपनीने शासनाची ४० एकर जमीन अत्यंत कमी किमतीत विकत घेऊन केवळ ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले, तर प्रत्यक्षात या जमिनीचे मूल्य सुमारे १८०० कोटी रुपये असल्याचा आरोप विपक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
या व्यवहारात शासनाची फसवणूक झाल्याचे नमूद करत, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१६(५), ३१८(२), ३(५) तसेच महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम ५९ प्रमाणे आणि भादंवि कलम ४०९, ४२०, ३४ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान, पार्थ पवार यांचे नाव गुन्ह्यातून वगळण्यात आले असले, तरी या संपूर्ण व्यवहारात त्यांच्या कंपनीचा सहभाग असल्याने प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे.
मुद्रांक शुल्क विभागानेही अमेडिया कंपनीला नोटीस बजावून तपास सुरू केला आहे.
अंबादास दानवे यांनी या व्यवहारावर प्रश्न उपस्थित करत सांगितले की,
केवळ २७ दिवसांत १८०० कोटींची जमीन ३०० कोटींना विकत घेण्यात आली. हे प्रकरण म्हणजे थेट शासनाची फसवणूक आहे.”
या वादग्रस्त जमीन व्यवहाराची चौकशी सुरू असून, पुणे पोलिस व मुद्रांक शुल्क विभाग या प्रकरणातील सर्व आर्थिक आणि कायदेशीर बाबींचा सखोल तपास करीत आहेत.




https://shorturl.fm/Me9VE
https://shorturl.fm/umoot