गुन्हेगारांना पुण्यातून हद्दपार! DCP मिलिंद मोहिते यांची धडाकेबाज कारवाई – ९ सराईत दोन वर्षांसाठी तडीपार


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस…

मिलिंद मोहिते यांच्या नेतृत्वाखाली परिमंडळ ०२ मध्ये मोठी प्रतिबंधक कारवाई करत तब्बल ९ सराईत गुन्हेगारांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१)(अ)(ब) अन्वये दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
ही कारवाई पुणे शहर, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच पुणे जिल्हा हद्दीतून लागू करण्यात आली असून, गुन्हेगारांच्या मनात जबरदस्त धडकी भरवणारी ठरली आहे.

कोणत्या गुन्ह्यांमध्ये सहभाग…

सदर आरोपींवर बेकायदेशीर हत्यार वापरणे, गंभीर दुखापत, धमकी, मारहाण, घरफोडी, जबरी चोरी, दरोड्याची तयारी, दहशत माजवणे, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, अंमली पदार्थ विक्री, जातीवाचक भाष्य, पुरावा नष्ट करणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्द…

१) जालिंदर मसा मोरे (वय ४८)
२) अण्णा उर्फ गणराज सुनील ठाकर (वय २६)
३) ओंकार लक्ष्मण सणस (वय २३)
४) राजू महादेव डेंगळे (वय २२)

Advertisement

आंबेगाव पोलीस स्टेशन हद्द…

१) आकाश गुलाबराव कांबळे (वय २१)
२) कृष्णा बबन लोखंडे (वय २४)
३) आर्यन बापू बेलदरे (वय २४)

मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हद्द..

१) सोमगौडा गुरन्ना चौधरी (वय ३३)
२) साहिल भीमा अष्टगे (वय २०)

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
ही संपूर्ण कारवाई अमितेश कुमार (पोलीस आयुक्त, पुणे शहर), रंजन कुमार शर्मा (पोलीस सह आयुक्त) आणि राजेश बनसोडे (अपर पोलीस आयुक्त) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

पुढेही कारवाईचा इशारा
पोलीस उप आयुक्त मिलिंद मोहिते यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, परिमंडळ ०२ मधील रेकॉर्डवरील सक्रिय गुन्हेगारांवर यापुढेही अशाच प्रकारची कठोर प्रतिबंधक कारवाई सुरूच राहील.
👉 “गुन्हेगारांनी गुन्हेगारी सोडावी, अन्यथा पुण्यात स्थान नाही,” असा कडक संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!