तीन सराईत अट्टल दुचाकी चोरट्याना कोंडवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
पुणे शहर व पुणे ग्रामीण भागातील डिलेव्हरी बॉय व इतर नागरीकांच्या दुचाकी चोरणा-या अट्टल सराईत ३ चोरट्यांकडुन सात लाख पन्नास हजार रुपये च्या तब्बल २० दुचाकी जप्त
कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत वाहन चोरीच्या गुन्हयाना प्रतिबंध करण्यासाठी तसेच घडलेल्या गुन्हयाचे उकल करण्याचे अनुषंगाने पेट्रोलिंग करुन सीसीटिव्ही फुटेज चेक करुन चोरीची वाहनाचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, यांनी सुचना दिल्या होत्या. सदर सुचनाप्रमाणे तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे व त्यांचे तपास पथकाचे पो.अं. संतोष बनसुडे व पो.अं. सागर भोसले हे सीसीटीव्ही फुटेज चेक करीत असताना तसेच पो. हवा. निलेश देसाई यांनी सदर सीसीटीव्ही फुटेज प्राप्त ठिकाणांचे तांत्रिक विश्लेषण करुन संशयित वाहन चोरीचे आरोपी निष्पन्न केले.
गौस मिरासाहब शेख वय २० वर्षे, रा.मु. पो. बावलगाव, ता. औराद, जि. बिदर, कर्नाटक सध्या रा. हांडेवाडी, पुणे २) शाहरुख कासीम शेख वय २५ वर्षे, मुळ रा.मु.पो. गुंडपंत दापका, ता. मुखेड, जि. नांदेड सध्या रा. हांडेवाडी, पुणे व ३) जुबेर अहमद मंगरुळे वय २९ वर्षे, मुळ रा. मु.पो. गुडपंत दापका, ता. मुखेड, जि. नांदेड सध्या रा. दिघी,
सदर आरोपी कडे चैकशी केली असता त्यांचेजवळ असलेल्या वाहनांबाबत चौकशी करता ते उडवाउडवीची उत्तरे देवु लागले. त्यांना ताब्यात घेवुन सखोल तपास केला असता वरील आरोपीतांकडुन २ बुलेट, ६ स्प्लेंडर, ३ अॅक्टिव्हा, १ ज्युपिटर, २ शाईन, १ ड्रिम युगा, ३ पॅशन, २ एच एफ डिल्कस अशा चोरी केल्याचे सांगुन नमुद चोरी केलेल्या गाड्या या ग्राहक मिळेपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी लपवुन ठेवल्याचे सांगीतले. सदर आरोपी यांच्याकडुन एकुण २० चोरीच्या दुचाकी जप्त करून एकुण ७,३०,०००/- रुपये किमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. वरील तीनही आरोपीकडुन
१. कोंढवा पोलीस स्टेशन कडील एकुण ९ गुन्हे उघडकीस
. हडपसर पोलीस स्टेशन कडील एकुण २ गुन्हे उघडकीस
२ ३. भारतीविद्यापीठ पोलीस स्टेशन कडील एकुण २ गुन्हे उघडकीस
४. वानवडी, मुंढवा, लोणीकंद, यवत, चिखली, चिंचवड, या पोलीस स्टेशनकडील प्रत्येकी १ गुन्हा उघडकीस व आध्र प्रदेश भागातुन चोरी केलेली ए पी २८ बी जे ०५७२ ही दुचाकी देखील चोरल्याचे निष्पन्न झाले आहे
वरिल प्रमाणे कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त साो परि.०५, श्री. आर. राजा, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग श्री. धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. मानसिंग पाटील, यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोलीस अंमलदार सतिश चव्हाण, निलेश देसाई, विशाल मेमाणे, गोरखनाथ चिनके, सागर भोसले, संतोष बनसुडे, शाहीद शेख, लक्ष्मण होळकर, सुरज शुक्ला, सुजित मदन या पथकाने केली आहे.



