पोलीस उपनिरीक्षकाकडून तरुणीवर बलात्कार, उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किरण महामुनी पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहे. पीडित युवती पोलीस भरतीची तयारी करत असताना त्यांची किरण सोबत ओळख झाली.

त्यानंतर त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. आरोपीने पीडितेला शिवाजीनगर गावठाण (Shivaji Nagar Gaothan) येथील एका घरी नेले. त्याठिकाणी तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

Advertisement

आरोपीने पीडित युवतीसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. यातून ती गर्भवती राहिली. हा प्रकार समजल्यानंतर किरण महामुनी याने पीडितेला जामखेड (Jamkhed Hospital) तालुक्यातील एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला.

त्याठिकाणी तिचा जबरदस्तीने गर्भपात केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक काळे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!