पुणे शहर ज्ञानोबा माऊली तुकाराम,माऊली जयघोषामुळे परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते….


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

विठुरायाच्या ओढीने पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झालेला वैष्णवांचा मेळा दोन दिवसांच्या मुक्कामासाठी शुकवारी पुण्यनगरीत विसावला. भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांच्या दर्शनासाठी शुक्रवारी रात्रीपासून भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. रात्रभर गर्दीचा हा ओघ शनिवारीही कायम राहिला. संपूर्ण पुणे शहरात उपनगरात या वेळी भाविकांच्या मुखातून निघणाऱ्या ज्ञानोबा माउली तुकाराम,माउली माउलीच्या जयघोषामुळे परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते.

तसेच शहरात दाखल झालेल्या प्रत्येक दिड्यांमध्ये सकाळी काकड आरती व सायंकाळी हरिपाठ झाला. वारकरी दिवसभर भजन-चरतनाम्रध्ये दंग झाले होते. ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलांसह महाविद्यालयीन तरूण-तरुणींचे समूहदेखील दर्शनानंतर पालखी परिसरात फिरण्याचा आनंद घेत होते. पालखीमुळे भवानी पेठ परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी, वारकऱ्यांसह शहरातील नागरीकांनी खरेदीचाही आनंद लुटला.

Advertisement

कुमठेकर रोडवरील नक्षत्र नऊवारी या दुकानासमोर सामाजिक कार्यकर्ते गणेश जी तुम्मा यांनी वारकऱ्यांसाठी विशेष व्यवस्था केली होती. या ठिकाणी सुया घे पोत घे फेम महाराष्ट्रातील लोकगीत गायक प्रदीप कांबळे यांनी वारकऱ्यांसमवेत गायनाचा कार्यक्रम केला तसेच वारकऱ्यांनीही गाण्यावर ठेका धरून आनंद घेतला तसेच भजन,कीर्तन,भारूड, गणगवळण साथ दिली तसेच त्रितपंथीय यांनी ही सहभागी होऊन ज्ञानेश्वर माऊली व तुकाराम माऊली यांचा जयघोष केला…


One thought on “पुणे शहर ज्ञानोबा माऊली तुकाराम,माऊली जयघोषामुळे परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!