आकाश थोरात या गुन्हेगारी टोळीने वर्चस्व निर्माण करण्याच्या उद्देशाने 19 वर्षीय सार्थक पंडित याचा केला खून….


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

पुणे शहरात छोट्या मोठया अनेक गुन्हेगारी टोळ्या कार्यरत आहेत. यांच्यात वर्चस्व निर्माण करण्याच्या वादातून हकनाक लहान मुलांचे बळी जातात असे असताना आंबेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत टोळीच्या वर्चस्व वादातून एका लहान मुलगा 19 वर्षीय सार्थक पंडित नामक व्यक्ती चा खून झाला…

आंबेगाव पोलीस स्टेशन ने दिलेल्या माहितीनुसार
दिनांक ०५/०४/२०२५ रोजी रात्री १०/३० वा. चे सुमारास यातील फिर्यादी व त्यांचा मित्र असे दुचाकीवरून राहते घरातून कात्रजकडे जात असताना जुन्या भांडणाच्या कारणावरून टोळी प्रमुख आकाश भरत थोरात, वय ३२ वर्षे, रा रुम नं २, परदेशी विल्डींग जवळ, साच्चाईमाता मंदिराच्या मागे, अटल चाळ नं ४. आंबेगाव खु॥ पुणे, २) टोळी सदस्य अजित अंकुश धनावडे वय २४ वर्षे (पाहिजे आरोपी), ३) टोळी सदस्य आदित्य जालिंदर शिंदे, वय १८ वर्षे, ४) टोळी सदस्य रोहीत बाळासाहेव कचरे वय २१ वर्षे ५) टोळी सदस्य विशाल उर्फ मोड्या दिपक गणेचारी वय २१ वर्षे, यांचे सांगणेवरून एकुण सहा विधीसंघर्षीत वालकांनी फिर्यादींच्या दुचाकीस गाड्या आडव्या मारून “तुम्हाला लय मस्ती आली का, तुमचे मित्र आदित्य काकडे व साहिल काकडे यांनी आमचा मित्र आदित्य शिंदे यास मारहाण केली आहे तुम्हाला आमच्या भाईंनी बघून घ्यायला सांगीतले आहे, तुम्हाला आता जिवंत सोडत नसतो.” असे बोलून फिर्यादी व त्यांचा मित्र यांस जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांचेवर धारदार हत्याराने वार करून गंभिर जखमी केल्याने आंबेगाव पोलीस ठाणेस गुन्हा रजि. नं. ५३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०९,१२६ (२), ३५२,३ (५), क्रि. लॉ. अं. अॅ. कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर घटनेत फिर्यादी यांचा मित्र उपचारादरम्यान मयत झाल्याने भारतीय न्याय संहिता क. १०३ प्रमाणे कलमवाढ केलेली आहे.

Advertisement

नमुद आकाश थोरात टोळीतील टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांचेवर संयुक्त व वैयक्तीकपणे सन २०१५ पासून एकुण १० गंभिर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्हे त्यांनी त्यांच्या टोळीची दहशत निर्माण करून त्यापासून आर्थिक फायदा मिळवीण्यासाठी केलेले आहेत. टोळी प्रमुख आकाश भरत थोरात याने त्याच्या टोळीचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या गुन्हेगार साथीदारांचा वापर केलेला आहे. टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांचेवर प्रत्येक वेळी प्रतिबंधक कारावाई करून देखील त्यांच्या बेकायदेशीर कारवाया वाढत चाललेल्या असल्याने त्यांचेवर ठोस व कडक कारवाई करणे आवश्यक होते.

सदरची उल्लेखनिय कामगीरी मा.श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर मा. श्री. राजेश बनसोडे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्रीमती स्मार्तना पाटील, पोलीस उप आयुक्त परि-२, पुणे शहर, मा. अतुल नवगिरे, सहा. पोलीस आयुक्त लष्कर विभाग तथा अतिरिक्त कार्यभार स्वागेट विभाग, पुणे शहर मा. राहुल आवारे सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. शरद झिने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आंबेगाव पोलीस स्टेशन, श्री गजानन चोरमुले पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. भोजलिंग दोडमिसे, सहा. पोलीस निरीक्षक, श्री युवराज शिंदे पोलीस उप निरीक्षक व स.पो. फौजदार चंद्रकांत माने, पो. हया. ७४२१ ढमढेरे, पो शि. ८१३८ अजय सावंत, पो. शि. आबासो खाडे यांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!