माजी नगरसेवक पुत्र शिवम उदयकांत आंदेकर व इतर ५ जणांविरुद्ध खंडणी व दरोडा अन्वये गुन्हा दाखल…


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

पुणे शहरात पेठ परिसरात,लक्ष्मी रोड,तुळशीबाग, गणेश पेठ,मच्छी मार्केट, बोंबील मार्केट काही माजी नगरसेवक,गुंड प्रवृत्तीची लोक छोट्या व्यावसायिक नागरिकांना रोड किंव्हा सरकारी जागेत व्यवसाय करण्यासाठी दर महिना हप्त्याची मागणी करतात लाखो रुपयांची अनधिकृत माया जमा करतात.नाही दिल्यास महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्याची धमकी देण्यात येते तसेच गुंड लोक सामानाची तोडफोड करून धमक्या दिल्या जातात महानगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांचा गैरवापर करून मोठया प्रमाणात खंडण्या मागितल्या जातात असे असताना सर्वसामान्य व्यावसायिकांचा वाली कोण हा प्रश्न निर्माण होतो…

फरासखाना पोलीस स्टेशन, अंतर्गत येणाऱ्या गणेश पेठ मच्छी मार्केट याठिकाणी सरकारी जागेवर व्यवसाय करण्यासाठी माजी नगरसेवक, यांच्या पुत्रा ने यातील फिर्यादी यांना गणेश पेठ मच्छी मार्केट याठिकाणी सरकारी जागेवर व्यवसाय करण्यासाठी शिवम उदयकांत आंदेकर वय २९ वर्ष रा. डोके तालीम मागे, नाना पेठ, पुणे याने जीवे ठार मारण्याची धमकी देवून दरमहा ५० हजार रुपये हप्त्याची मागणी करून सन २०१६ पासून त्याचा हस्तक नामे आकाश परदेशी रा. लोहीया नगर, पुणे याचे करवी एप्रिल-२०२५ पर्यंत अंदाजे रुपये ४८ लाख खंडणीपोटी प्रत्यक्ष व ऑनलाईन पध्दतीने वसूल केलेबाबत व त्यानंतर फिर्यादि यांनी एप्रिल-२०२५ पासून आर्थिक अडचणीमुळे हप्ता देण्यास असमर्थता दाखविल्यावर त्यांना मे -२५ मध्ये परत जीवे मारण्याची धमकी देवून त्यांचे अपरोक्ष दुकानातील मासे व्यवसायचे ९०,०००/- किं रु. चे सामान ४ ते ५ गुंडाकरवी बाहेर फेकून दिले, सदरचे सामान फिर्यादी हे घेण्यास गेले असता त्यांना ते न देता जबरदस्तीने टेम्पोमध्ये घालून घेवून निघून गेले. त्याबाबत फिर्यादी यांनी वेळोवेळी सदरचे सामान परत करणेबाबत व व्यवसाय करू देणेबाबत विनंती केली असता त्यांना व त्यांच्या पत्नीला अपमानित करून हकलून दिलेबाबत लेखी तक्रार दिल्याने सदरबाबत तात्काळ फरासखाना पोलीस स्टेशन गु.र.नं १०८/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०८ (२) (४) (५), ३१० (२), ३५१ (३), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी नामे शिवम उदयकांत आंदेकर वय २९ वर्ष रा. डोके तालीम मागे, नाना पेठ, पुणे व आकाश सुरेश परदेशी वय २८वर्ष रा. लोहीयानगर, पुणे यास चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले आहे.

Advertisement

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री. रंजन कुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त, परि-१ (अतिरीक्त कार्यभार) मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे शहर श्रीमती. अनुजा देशमाने, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फरासखाना पोलीस ठाणे श्री. प्रशांत भस्मे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. अजित जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री. वैभव गायकवाड, पोलीस उप निरीक्षक, अरविंद शिंदे, फरासखाना पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!