मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्या चोरट्यास स्वारगेट पोलिसांनी केली अटक….


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

स्वारगेट पोलीस ठाणे हद्दीमध्ये दि.२३/०५/२०२५ रोजी एका अज्ञात चोरटयाने मुकुंदनगर येथील सुर्यमुखी चंदनी आंबा माता मंदीराचा दरवाजा तोडुन मंदीरातील दानपेटी मधील रोख रक्कम चोरी केली होती. त्यावरुन मंदीर कमिटीच्या तक्रारीवरुन स्वारगेट पोलीस स्टेशन गुन्हा केला 

त्यावरुन दि.३०/०५/२०२५ रोजी स्वारगेट एसटी स्टॅन्ड परिसरामध्ये सदर सीसीटिव्ही फुटेजमधील आरोपीचा तपास पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदार शोध घेत असताना सदर गुन्ह्याचे सीसीटिव्ही फुटेज मधील आरोपीच्या वर्णनाचे मिळता-जुळता वर्णनाचा इसम हा पोलीस अंमलदार शंकर संपते व सागर केकाण यांना पाहुन पळुन जावुन लागल्याने त्यास स्टाफचे मदतीने ताब्यात घेवुन नाव व पत्ता विचारता महादेव तुकाराम गिरमकर वय ४२ वर्षे रा.मु.पो. कवठा विकास वाडी ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले दरम्यान तो त्याचे कडील पिशवीस सारखा हात लावुन पिशवी पाठीमागे लपवत असल्याचे दिसुन आले. तद्नंतर दोन पंचासमक्ष त्याची आहे त्यास्थितीत अंगझडती घेतली असता त्याचे पिशवीमध्ये रोख रक्कम, लोखंडी हातोडी, कटावणी, स्क्रू ड्रायव्हर व दोन एक्सा ब्लेड अशी हत्यारे मिळुन आल्याने त्यास सदर रोख रक्कम व हत्यांरासह पुढील कारवाई कामी पंचासह स्वारगेट पोलीस स्टेशन येथे आणुन त्याचेकडे अधिक कसुन तपास केला असता त्याने सांगितले की, मागील आठवडयात त्याने मुकुंदनगर येथील देवाच्या मंदीरामध्ये चोरी केली असुन सदर रक्कम दान पेटीमधील आहे असे सांगुन त्याने वर नमुद दाखल गुन्हा केल्याचे कबुली दिल्याने त्यास दाखल गुन्हयात अटक करुन तपासा दरम्यान त्याचेकडुन ३८,४००/- रुपये रोख रक्कम व मंदीरामध्ये चोरी करणेकामी वापरलेली हत्यारे जप्त करुन दाखल गुन्हा उघडकीस आणला आहे.

Advertisement

सदरची कामगिरी ही मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ २. श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. युवराज नांद्रे, स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्या आदेशान्वये तपास पथकातील अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर, पोलीस उप-निरीक्षक रविंद्र कस्पटे, शैलेश आलाटे, पोलीस अंमलदार शंकर संपते, सागर केकाण, अश्रुबा मोराळे, हर्षल शिंदे, सुजय पवार, संदीप घुले, फिरोज शेख, रमेश चव्हाण, दिपक खंदाड, प्रशांत टोणपे, हनुमंत दुधे यांनी केली आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!