आंबेगाव पोलीस स्टेशनच्या नुतन इमारतीचे पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन…


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

पुणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या आंबेगाव पोलीस स्टेशनच्या नवीन इतारतीचे मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने यांचे मार्गदर्शनाखाली बांधकाम पुर्ण करण्यात आले असुन आंबेगाव पोलीस स्टेशनच्या नवीन इतारतीचे उ‌द्घाटन मा. पोलीस आयुक्त, श्री. अमितेश कुमार यांच्या हस्ते फित कापुन व कोनशीला अनावरण करुन दिनांक २३/०५/२०२५ रोजी करण्यात आले आहे.

दिनांक ११/१०/२०२४ रोजी पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये आंबेगाव पोलीस स्टेशन या नवीन पोलीस स्टेशनची निर्मीती करण्यात आली असुन तेव्हापासुन नवनिर्वाचीत आंबेगाव पोलीस स्टेशनचे सर्व कामकाज सुरु झाले होते. आंबेगाव पोलीस स्टेशनची निर्मीती होतेवेळी पोलीस स्टेशनचे कामकाजाकरीता फक्त दोन रुम उपलब्ध होत्या व सदरच्या दोन रुममध्येच आंबेगाव पोलीस स्टेशनचे सर्व कामकाज सुरु होते.

Advertisement

सदर कार्यक्रमास मा. सह पोलीस आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-२ पुणे शहर श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. राहुल आवारे, आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने, पोलीस निरीक्षक श्री. गजानन चोरमले, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रियांका गोरे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वंजारी, स्वाती देवधर, भोजलींग दोडमीसे, मोहन कळमकर, रतिकांत कोळी, युवराज शिंदे, मारुती वाघमारे, नितीराज थोरात, सुरेश शिंदे, आंबेगाव पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!