माजी आमदार रमेश बागवे सुपुत्राच्या बेकायदेशीर हुक्का पार्लरवर कोंढवा पोलीसाकडुन धडक कारवाई…


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

पुणे शहरात पोलीस प्रशासना कडून बेकायदेशीर धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश असताना माजी आमदार रमेश बागवे यांच्या पुत्र बाकिर रमेश बागवे, वय ३६ वर्षे,यांच्या मालकीच्या कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत बेकायदेशीर चालु असणाऱ्या हुक्का पार्लर वर कोंढवा पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात आली…

 

कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत बेकायदेशीर चालु असणाऱ्या अवैध धंदयाचा शोध घेवुन कारवाई करण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर व पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील यांनी आदेशित केले होते. सदर आदेशाप्रमाणे दि.२९/०८/२०२४ रोजी रात्रगस्त अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक अमित शेटे व पोलीस अंमलदार असे पेट्रोलिंग करुन बेकायदेशीर व चोरुन चालु असणा-या अवैध धंदयाचा शोध घेत होते. तसेच गुप्त बातमीदाराकडुन माहिती काढत होते. तेव्हा त्यांना माहिती मिळाली की, एनआयबीएम रोड येथील द व्हिलेज हॉटेल, मध्ये चोरुन ग्राहकांना बेकायदेशीरपणे हुक्का पिण्यासाठी उपलब्ध करुन दिला जात आहे. तेव्हा सदर ठिकाणी छापा टाकुन कारवाई केली असता द व्हिलेज हॉटेलचे चालक १) बाकिर रमेश बागवे, वय ३६ वर्षे, रा भवानी पेठ लोहियानगर फ्रायर ब्रिगेड पुणे समोर, पुणे २) हरुन नबी शेख, वय २५ वर्षे, रा. मालुंचाइस्ट्री थना शांतीपुर जि नोदीया, पश्चिम बंगाल, ३) बिक्रम साधन शेख, वय २० वर्षे, रा. सदर ४) अमानत अन्वर मंडळ, वय २२ वर्षे, रा. सदर ५) अमानत अन्वर रा. सदर हे ग्राहकांना बेकायदेशीरपणे हुक्का पुरवित असल्याचे दिसुन आले.

Advertisement

सदर इसमांकडुन २३,५००/- रु कि तंबाखुजन्य हुक्काचे फलेवर व ९ काचेचे हुक्काचे पॉट व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच सदर इसमांच्या विरुध्द कोंढवा पोलीस ठाणे येथे गुरन.१०१०/२०२४ सिंगारेट व अन्य तबाखुजन्य उत्पादने अधि. २०१८ चे कलम. ४(अ) २१(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरील कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त परि.०५, श्री.आर राजा, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग (अतिरिक्त कार्यभार) श्रीमती अश्विनी राख, कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. मानसिंग पाटील, यांच्या मार्गदर्शन व सुचना प्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंमलदार अक्षय शेंडगे, राहुल थोरात, सुहास मोरे, प्रदिप बेडिस्कर यांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!