अल्पवयीन मुलांकडून ०९ चोरीच्या मोटार सायकल कोंढवा पोलीसांकडुन जप्त


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

पुणे शहर कोंढवा पोलीस स्टेशन परिसरात खाडीमशीन चौक ते उंन्ड्री चौक दरम्यान असणा-या पेट्रोल पंपाच्या गल्लीत काळे व निळे रंगाची पेंशन प्लस मोटार सायकल घेवुन उभे असुन त्याच्याकडील मोटार सायकलला नंबर प्लेट नाही. सदर मोटार सायकल चोरीची असल्याबाबत संशय आहे. सदर माहितीच्या अनुषंगाने नमुद ठिकाणी कोंढवा पोलीस ठाणे कडील तपास पथक स्टाफ शोध घेणकामी गेले असता त्याठिकाणी दोन इसम हे त्याच्याकडील बंद पडलेली विना नंबर प्लेट मोटार सायकल चालु करित होते. तेव्हा त्याच्याकडे असणारी मोटार सायकल चोरीची असल्याचा संशय वाटल्याने त्यांना ताब्यात घेतले

कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत वाहन चोरीच्या गुन्हयाना प्रतिबंध करण्यासाठी तसेच घडलेल्या गुन्हयाचे उकल करण्याचे अनुषंगाने पेट्रोलिंग करुन सीसीटिव्ही फुटेज चेक करुन चोरीची वाहनाचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर व पोलीस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील, यांनी सुचना दिल्या होत्या.

Advertisement

सदर सुचनाप्रमाणे तपास पथक अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, व त्यांचे पथक पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार राहुल थोरात, सुहास मोरे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली त्याच्याकडे असणारी मोटार सायकल चोरीची असल्याचा संशय वाटल्याने त्यांना ताब्यात घेवुन नाव व पत्ता विचारता ते अल्पवयीन बालक असल्याचे लक्षात आले. तेव्हा त्याच्याकडे मिळुन आलेल्या मो.सा. बाबत चौकशी केली असता ते उडवाडवीचे उत्तरे देवु लागले तेव्हा त्यांना ताब्यात घेवुन पोलीस ठाणेस आणुन त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्याच्या ताब्यात मिळुन आलेली पॅशन मो.सा.ही काकडे पॅलेस कर्वेनगर येथुन चोरी केली असल्याचे सांगितले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता एकुण ०९ गुन्हे उघड होवुन ३,६०,०००/-रु कि मो.सा. जप्त करण्यात आलेल्या आहेत.

वरिलप्रमाणे कामगिरी ही, मा. पोलीस उप आयुक्त परि.०५ श्री. आर. राजा, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग श्री. धंन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील, यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोउपनिरी बालाजी डिंगोळे, पो. अंमलदार अमोल हिरवे, सुहास मोरे, राहुल थोरात, अभिजीत जाधव, राहुल रासगे, गणेश चिंचकर, अभिजीत रत्नपारखी, विकास मरगळे, मयुर मोरे, अक्षय शेंडगे, अनिल बनकर यांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!