खासदार गजानन कीर्तीकरांची शिंदेच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्याची मागणी…
मुबंई प्रतिनिधी :- मुंबई उत्तर पश्चिममध्ये गजाजन कीर्तिकरांचेच पुत्र अमोल किर्तीकर विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे रवींद्र वायकर अशी लढत झाली. गजानन किर्तीकर शिंदे गटात आहेत. पण मुलगा अमोल किर्तीकर ठाकरे गटाकडून निवडणूक लढला. त्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी आहे. तर शिशिर शिंदेंनी गजानन कीर्तीकरांनी हकालपट्टी करण्याची मागणी करताच, भाजपनंही गंभीर आरोप केले आहेत.
गजानन कीर्तीकरांना अस्तनीतले निखारे म्हणत मुलाला खासदार करण्यासाठी षडयंत्र रचल्याचा आरोप, भाजप नेते प्रवीण दरेकरांनी केलाय. एकनाथ शिंदेंकडून उमेदवारी घेवून अर्ज मागे घेण्याचा गजानन कीर्तिकरांचा कट होता. मुलगा अमोल कीर्तिकरांना बिनविरोध करण्याचा डाव होता, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केलाय.
गजानन कीर्तिकर आणि त्यांच्या पत्नी यांनी पक्ष विरोधी वक्तव्य करुन ठाकरे गटाची बाजू घेतली. मतदानादिवशी गजानन कीर्तिकरांच्या पत्नीनं मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला. गजानन कीर्तिकरांचा खासदार निधी अमोल यांनी प्रचारासाठी आणि विकास कामांसाठी वापरला. अमोल हे गजानन कीर्तिकर यांच्या कार्यालयातून कारभार करत होते. यामुळे ठाकरे गटाला फायदा झाला. गजानन कीर्तिकरांचे उद्योग पक्षाला बदनाम करत आहेत. गजानन कीर्तिकरांना ‘मातोश्री’वर लोटांगण घालण्याची घाई झाली आहे. ‘मातोश्री’चे ‘लाचार श्री’ होणाऱ्यांना पक्षातून त्वरित बाहेरचा रस्ता दाखवा. गजानन कीर्तिकरांची पक्षातून त्वरित हकालपट्टी करावी आणि त्यांना निरोपाचा नारळ द्या”, असं शिशिर शिंदे पत्रात म्हणाले आहेत.



