लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यासाठीचा प्रचार शनिवारी सायंकाळी शांत झाला. महाराष्ट्रातील ११ जागांचाही समावेश…
पुणे प्रतिनिधी :- लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यासाठीचा प्रचार शनिवारी सायंकाळी समाप्त झाला. त्या टप्प्यात १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ९६ जागांसाठी सोमवारी (१३ मे) मतदान होईल.
महाराष्ट्रातील ११ जागांचाही समावेश आहे.
महाराष्ट्रातील पुणे, शिरूर, मावळ, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर आणि जालना मतदारसंघांमधील मतदार त्यांचा हक्क बजावतील. चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात २९८ उमेदवारांचे भवितव्य ठरेल. सोमवारी मध्यप्रदेशातील ८, पश्चिम बंगालमधील ८, बिहारमधील ५, ओडिशा आणि झारखंडमधील प्रत्येकी ४ जागांसाठी मतदान होईल. त्याशिवाय, जम्मू-काश्मीरमधील एका जागेसाठी मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यातील लोकसभेच्या ९६ जागांसाठी एकूण १ हजार ७१७ उमेदवार नशीब आजमावत आहेत.
महाराष्ट्रात अवकाळी पावसाने तुफान बॅटिंग केली आहे. गेल्या काही दिवसात तापमानाचा पारा आत्ती उच्च होता पण आता पारा घसरत चालल्याने मात्र लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा पारा वाढत आहे राजकीय हवा प्रचंड तापली आहे. महायुतीच्या प्रचाराची सांगता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेने तर महाविकास आघाडीच्या प्रकारचे प्रचाराची सांगता विधानसभा निहाय प्रचार रॅली व पत्रकार परिषदेने झाली दोन्ही बाजूनी आम्ही जिंकणार असा आत्मविश्वास व्यक्त करण्यात आला. महाविकास आघाडी कडून रवींद्र धंगेकर, महायुतीकडून मुरलीधर मोहोळ, वंचित बहुजन आघाडी कडून वसंत मोरे, एमआयएम कडून अनिस सुंडके निवडणूक रिंगणात आहेत. गेल्या महिन्याभरात प्रचार केल्यास सभा ,पथनाट्य च्या माध्यमातून सर्वच उमेदवारांनी प्रचार केला .विशेष म्हणजे पुण्यातील प्रचार महायुती , महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, एम आय एम, पुणे शहरात कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण झाला नाही,

