पुरंदर विधानसभेतून खा सुळेंची प्रचारात आघाडी :-आ संजय जगताप


खा सुळे यांच्या पुरंदर – हवेली मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन

सासवड :(प्रतिनिधी) पुरंदर विधानसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून सर्वसामान्य जनता खा सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे., लोकशाही वाचविण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, तरूण, महिलांचे नेतृत्व करणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा संसदेत पाठविण्यासाठी आपण सर्वांनी खा सुप्रिया सुळे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायचे आहे असे आवाहन पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी यांनी केले.
सासवड येथील काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या मध्यवर्ती कार्यालयाचा शुभारंभ आ संजय जगताप यांच्या हस्ते झाले. या कार्यालयातून प्रचार रचना, नियोजन आदींबाबत कार्यकर्त्यांना माहिती देण्यात येणार असून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, युवकचे अध्यक्ष उपस्थित राहणार असल्याचे आमदार संजय जगताप यांनी सांगितले.

Advertisement

दि १८ एप्रिल रोजी खा सुप्रिया सुळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचेही आ संजय जगताप म्हणाले.
यावेळी माजी जि प अध्यक्ष विजय कोलते, माजी जि प सदस्य सुदामराव इंगळे, बबूसाहेब माहूरकर, नंदकुमार जगताप, आत्माराम कामथे, वामनराव कामठे, यांसह काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अभिजीत जगताप, आपचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय कड, काँग्रेसच्या महिलाध्यक्षा सुनिता कोलते, राष्ट्रवादीच्या महिलाध्यक्षा अॅड गौरी कुंजीर, बाळासो भिंताडे, बंडूकाका जगताप, संजय टिळेकर, तुषार जगताप, संपतराव जाधव यांसह महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!