पदपथ मोकळे होणार का? ‘जागल्या’ संकल्पनेने पुणेकरांना दिलासा?
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस….
पुणे शहरातील पदपथ हे नागरिकांसाठी की अवैध व्यावसायिकांसाठी? असा संतप्त सवाल पुणेकर गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. अतिक्रमण, फेरीवाले, पार्किंग आणि तुटलेले फरसबंदी यामुळे पादचाऱ्यांना अक्षरशः रस्त्यावरून चालावे लागत असल्याचे चित्र शहरभर पाहायला मिळते.
याच पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या वतीने विशेष फुटपाथ दुरुस्ती अभियान सुरू करण्यात आले असून, उद्घाटन प्रसंगी मा. महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे यांनी ‘जागल्या’ ही नवी संकल्पना जाहीर केली आहे.महापौरांच्या माहितीनुसार –
प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात ‘जागल्या’ कर्मचारी नियुक्त केला जाणार.
Advertisement
पुणे शहरातील महापालिकेचा कर्मचारी रोज १ ते २ तास पायी फिरून आपल्या कार्यक्षेत्रातील पदपथांची पाहणी करणार.
फुटपाथवरील अडथळे, अतिक्रमण, तुटलेली फरसबंदी, अडथळे निर्माण करणारे साहित्य याची नोंद घेऊन संबंधित अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करणार.
त्यानुसार तातडीने दुरुस्ती आणि अडथळे दूर करण्याची कारवाई केली जाणार.
महापौरांनी विश्वास व्यक्त केला की, या विशेष अभियानामुळे पादचाऱ्यांना चालणे सुलभ होईल आणि पदपथांचा मूळ उद्देश पूर्ण होईल.



