एक वर्षा पासून फरार आरोपी खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा च्या जाळ्यात…


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील १ वर्षापासुन पाहिजे असलेल्या व पोलीसांना गुंगारा देणा-या रेकॉर्ड वरील आरोपी स्वप्निल संतोष काळे, वय-२० वर्षे, रा. जांभुळवाडी, या आरोपीला केले जेरबंद.

मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, पुणे शहर यांचे आदेशाने परिमंडळ १,२ व ३ पोलीस स्टेशनचे हद्दीत कोंबिंग ऑपरेशन करीत असताना पोलीस अंमलदार महेश पाटील यांना सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ४४३/२०२३ भा.द.वि.क.३०७,३२६,५०६,३४ व मुं.पो.का.क. ३७ (१) सह १३५ या दाखल गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी हा सिटी प्राईड समोर, कोथरूड, पुणे या ठिकाणी काम करीत असले बाबतची खात्रीशिर बातमी मिळाली.

सदर बातमीप्रमाणे खात्री झाल्याने स्टाफचे मदतीने सापळा रचून त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे चौकशी करुन सदर इसमास त्याचे नाव, पत्ता विचारता त्याने आपले नाव व पत्ता स्वप्निल संतोष काळे, वय-२० वर्षे, रा. जांभुळवाडी, पुणे असे सांगितले. सदर आरोपीचा गुन्हे अभिलेख पाहता त्याचेवर गुन्हे दाखल आहेत व तो गुन्हा घडलेपासून दीड वर्षापासुन पोलीसांना गुंगारा देत आहे.

Advertisement

ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाकडे वरील दाखल गुन्ह्याबाबत अधिक चौकशी करता तो दाखल गुन्ह्यामध्ये निष्पन्न असल्याचे कबुली दिल्याने त्यास पुढील कारवाई करीता सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

पुणे शहरचे मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे १) श्री. गणेश इंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक १ श्री. नंदकुमार बिडवई, यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलीस अंमलदार गणेश ढगे, प्रदीप राठोड, अजित शिंदे, मनिषा पुकाळे, श्रीकांत दगडे, महेश पाटील, साईकुमार कारके, अमित गद्रे यांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!