ग्राहक जागृती न्यूजचा दणका! गंगाधाम हिलटॉप-हिलस्लोप परिसरातील ६५ हजार चौ.फुट अवैध बांधकामे भुईसपाट!
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
पुणे (बिबवेवाडी) – ग्राहक जागृती न्यूजच्या सातत्यपूर्ण बातम्या व तक्रारींच्या दणक्यामुळे अखेर पुणे महापालिकेने गंगाधाम हिलटॉप-हिलस्लोप परिसरातील अवैध गोदामे व बांधकामांवर मोठी कारवाई केली. मंगळवारी (दि. ११) सकाळपासूनच मनपाच्या पथकांनी धडक मोहीम राबवत तब्बल २९ बेकायदेशीर गोदामे पाडून सुमारे ६४ हजार चौरस फूट अवैध बांधकामे भुईसपाट केली.

ग्राहक जागृती न्यूजने याच अवैध गोदामांबाबत गेल्या काही महिन्यांपासून अनेकदा तक्रारी, बातम्या आणि पुरावे प्रशासनाला सादर केले होते. मात्र, राजकीय दबावामुळे कारवाई टाळली जात होती. अखेर स्थानिक नागरिकांच्या आवाजाला प्रतिसाद देत प्रशासनाने निर्णायक पाऊल उचलले आणि डोंगर माथा मोकळा झाला.
परिसरातील नागरिकांनी दिलासा व्यक्त करत म्हटले –
> “गेल्या काही वर्षांत या परिसरातील बांधकाम व्यावसायिक आणि गोदामधारकांनी संपूर्ण डोंगर काबीज केला होता. त्यामुळे आयुर्वेदिक वनस्पती आणि झाडे नष्ट झाली होती. आता परिसर पुन्हा श्वास घेईल.”
या परिसरात दोन वर्षांपूर्वी भीषण आग लागल्याची घटना घडली होती, त्यानंतरही प्रशासन झोपलेलेच राहिले. अनेकदा नोटीसा दिल्यानंतरही राजकीय पाठबळामुळे अधिकारी कारवाई करण्यास असमर्थ ठरत होते. महापालिकेने तीनपट कर लावूनही अनेकांनी कर न भरल्याचे समोर आले आहे.
मात्र, आता निवडणुकीच्या उंबरठ्यावर प्रशासनाला जाग आली असून, कारवाईनंतर इतर अवैध बांधकामधारकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष लक्षवेधी मुद्दे :
ग्राहक जागृती न्यूजच्या बातमीनंतर मनपाची धडक कारवाई
६४,००० चौ.फुट बांधकाम भुईसपाट
२९ अवैध गोदामांवर कारवाई
डोंगर माथा मुक्त, परिसरातील नागरिकांचा दिलासा
निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या कारवाईने राजकीय चर्चांना ऊत



