बिबवेवाडी अप्पर परिसरात गोळीबार, परिसरात दहशतीचे वातावरण….


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

बिबवेवाडी पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असून अप्पर परिसरात भरदिवसा गोळीबाराने दहशत निर्माण झाली पवन सुभाष गवळी (२८, रा. बिबवेवाडी ओटा) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गवळी हा दुचाकीवरून निघाला होता. त्यावेळी तिघांनी चौकात गाठून त्याच्यावर गोळी झाडल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर गवळी याने गाडी न थांबवता थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली.बिबवेवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Advertisement

ही घटना सोमवारी (दि. ३) दुपारी पावणेदोनच्या सुमारास संविधान चौकात वीर बाजी पासलकर कमानीखाली घडली. घटना . घडल्यानंतर पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी धाव घेतली. पवन गवळी हा मोपेडवरून निघाला होता. त्यावेळी तोंडाला मास्क लावलेल्या तिघांपैकी एकाने त्याच्यावर गोळी झाडली. ही गोळी त्याच्या कंबरेच्या खाली घासून गेली. गोळी लागल्याचे समजताच, त्याने ■ थेट पोलिस ठाण्यात पळ काढला. गवळी हा माधव वाघाटे याच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याचे गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी सांगितले.

वाघाटे याचा खून • २०२१ मध्ये अत्यंत क्रूरपणे झाला होता. ऐन कोरोनाच्या काळात हा खून झाला होता. यानंतर वाघाटेच्या शेकडो समर्थकांनी र सहकारनगर ते कात्रज अशी भव्य अंत्ययात्रा काढली होती. यानंतर संबंधित बापोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांवर वरिष्ठांनी कारवाई केली होती. गवळी हा दोन 1. महिन्यांपूर्वी जामिनावर सुटला आहे. न्त याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले त असून, तपास सुरू असल्याचे परिमंडळ न्स पाचचे पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार 1. शिंदे यांनी सांगितले.

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!