अवघ्या ४ तासांत सोन्याचा हेर पकडला! स्वारगेट पोलिसांची ‘सुवर्ण’ कामगिरी”
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
स्वारगेट एस.टी. स्टॅन्ड परिसरात प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याचे चैन चोरी करणाऱ्या चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी अवघ्या ४ तासांच्या आत जेरबंद केले आहे. या चोरट्याकडून १६ ग्रॅम वजनाचे, किंमत सुमारे १.६० लाख रुपये असलेले सोन्याचे चैन हस्तगत करण्यात आले आहे…
सदर प्रकरणात स्वारगेट पोलीस स्टेशन गुन्हा र.नं. २६७/२०२५, भा.दं.वि. कलम ३७९ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता. फिर्यादी हे दि. ०७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी सुमारे १०.३० वा. कोल्हापूर एसटी स्टॅन्डवरून शिर्डी-इचलकरंजी एसटीमध्ये बसत असताना अज्ञात इसमाने गर्दीचा फायदा घेत गळ्यातील चैन कट करून पळ काढला होता.
घटनेनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. यशवंत निकम यांनी गुन्ह्याचा तपास गतीमान करण्याचे आदेश दिले. सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील व पो.उ.नि. रविंद्र कस्पटे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एक संशयास्पद इसम दिसून आला.
त्यानंतर पोलीस अंमलदार सागर काळे यांनी त्या इसमाचा फोटो बातमीदारांना पाठवून माहिती गोळा केली. काही तासांतच बातमी मिळाली की हा संशयित लक्ष्मीनारायण चौकात दिसून आला आहे. पोलीसांनी तत्काळ छापा टाकून आरोपी जालिंदर मोहनराव ढोबळे (वय ५०, रा. शेंद्रा, संभाजीनगर) यास अटक केली. चौकशीत आरोपीकडून चोरीस गेलेले चैन जप्त करण्यात आले.
कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलींद मोहिते, सहा. पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम व पोलीस निरीक्षक (गुन्हे) विकास भारमळ यांच्या आदेशानुसार करण्यात आली.
या यशस्वी कारवाईत सहा. पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, पो.उ.नि. रविंद्र कस्पटे, पो. हवा. अश्रुबा मोराळे, हर्षल शिंदे, अंमलदार सागर काळे, संदीप घुले, सुजय पवार, दिपक खंदाड, फिरोज शेख, रमेश चव्हाण, संग्राम केंद्रे, प्रशांत टोणपे व हनुमंत दुधे यांनी विशेष परिश्रम घेतले.




https://shorturl.fm/XNfZv
https://shorturl.fm/hjDh6
https://shorturl.fm/VKdH3
https://shorturl.fm/ONWM9