कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, भारती विदयापीठ पोलिसांचा वेगवान तपास आणि खुनीला जेरबंद!


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

कात्रज निंबाळकरवाडी परिसरातील शांतता एका भयानक शोधामुळे भंगली. गवतामध्ये कुजलेल्या अवस्थेत एका इसमाचा मृतदेह आढळून येताच परिसरात खळबळ उडाली. मात्र भारती विद्यापीठ पोलिसांच्या दक्ष आणि चोख तपासामुळे हा गुन्हा अवघ्या १२ तासांत उलगडला — आणि खुनीला पोलिसांनी जेरबंद केले!

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन
दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी गुजर-निंबाळकरवाडी, कात्रज परिसरातील गवतामध्ये एका अज्ञात इसमाचा कुजलेल्या आणि आळ्या पडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे व त्यांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पाहणीअंती हा मृत्यू नैसर्गिक नसून खून झाल्याची खात्री पटल्याने तपासास प्रारंभ करण्यात आला.

पोलिसांनी घटनास्थळाजवळील रहिवाशांकडून चौकशी केली असता, मृत व्यक्तीचे नाव सद्दाम ऊर्फ सलमान शेख (वय ३५ ते ४०, रा. गुजर निंबाळकरवाडी, कात्रज) असल्याचे समोर आले. यावरून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा र.नं. ४६४/२०२५ भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

Advertisement

तपासादरम्यान गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, सद्दाम शेखचा खून त्याचाच मित्र विक्रम चैठा रोतिया (वय ३२, रा. सणसनगर माळवाडी, कात्रज) याने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तत्काळ पथकाने सापळा रचून आरोपीला १२ ऑक्टोबर २०२५ रोजी गुजरवाडी परिसरातून अटक करण्यात आली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर शेंडे हे करीत आहेत.

ही यशस्वी कारवाई करण्यात आली:
मा. अपर पोलीस आयुक्त (पश्चिम विभाग) राजेश बनसोडे,
मा. पोलीस उप आयुक्त (परिमंडळ २) मिलींद मोहीते,
मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (स्वारगेट विभाग) राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर शेंडे, पो.उ.नि. निलेश मोकाशी तसेच अंमलदार सागर बोरगे, सागर कोंडे, सचिन सरपाले, विठ्ठल चिपाडे, सौरभ वायदंडे, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे, मितेश चोरमोले व अभिनय चौधरी यांनी मिळून केली आहे.

पोलिसांचा संदेश:
“गुन्हा कुठलाही असो — आरोपी कितीही चतुर असला तरी कायद्याच्या हातातून सुटू शकत नाही,”
असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी सांगितले.

 


12 thoughts on “कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, भारती विदयापीठ पोलिसांचा वेगवान तपास आणि खुनीला जेरबंद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!