खराडीत अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त; २.६१ लाखांचा ‘पॉपी स्ट्रॉ’सह तस्कर जेरबंद


पुणे प्रतिंनिधी :- मिलिंद राजहंस …

पुणे, दि. ६ जून : पुणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने खराडी परिसरात धडक कारवाई करत पॉपी स्ट्रॉ (अफू) या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका इसमाला अटक केली आहे. आरोपीकडून तब्बल १३ किलो ८० ग्रॅम पॉपी स्ट्रॉ जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे २ लाख ६१ हजार ६०० रुपये असल्याची माहिती

अंमली पदार्थ विरोधी पथक-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथक परिसरात गस्त घालत असताना खराडकर पार्क, थिटे वस्ती, साईकृपा बिल्डिंगसमोर एक इसम दोन गोण्यांसह संशयास्पदरीत्या उभा असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याची उत्तरे संशयास्पद वाटल्याने झडती घेण्यात आली.झडतीदरम्यान आरोपी मुकेश विष्णाई (वय ३०, रा. खराडकर पार्क, थिटे वस्ती, खराडी, पुणे) याच्या ताब्यातील गोण्यांमधून १३ किलो ८० ग्रॅम पॉपी स्ट्रॉ (अफू) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. हा साठा बेकायदेशीररित्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे तपासात समोर आले.
याप्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) गौरव हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Advertisement

 पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कडक धोरणामुळे हा प्रकार उघडीसआला यामुळे देखील विशेष लक्ष घालून, लक्ष ठेवून अशा रेव पार्ट्यांवर पोलिसांची कठोर कारवाई केली जाईल या प्रकरणातील संबंधित आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल जाणार आहे. 

पोलीस आयुक्त :- अमितेश कुमार 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!