गावठी पिस्टलसह दोन सख्खे भाऊ जेरबंद; मोठा गुन्हा घडण्याआधी वानवडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस…
दखलपात्र गुन्हा करण्याच्या तयारीत फिरत असलेल्या दोन सख्ख्या भावांना वानवडी पोलिसांच्या तपास पथकाने शिताफीने अटक केली असून त्यांच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल, ५ जिवंत काडतुसे, धारदार लोखंडी चाकू व अॅक्टीवा मोपेड असा एकूण १ लाख १२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
<span;>दि. १४ मे २०२६ रोजी वानवडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक व त्यांचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार अभिजीत चव्हाण यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, चॉकलेटी रंगाच्या अॅक्टीवा स्कुटरवरून दोन संशयित इसम फिरत असून ते कोणता तरी गंभीर दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने अग्निशस्त्र बाळगून वावरत आहेत.
<span;>सदर माहिती वरिष्ठांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तात्काळ सापळा रचून छापा कारवाई केली. यावेळी बातमीप्रमाणे संशयित इसम अॅक्टीवा मोपेडवरून येताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे साहील रफिक शेख (वय २१, रा. खजुरेवस्ती, वैदवाडी, हडपसर, पुणे) व सद्दाम रफिक शेख (वय २५) अशी सांगितली.
<span;>त्यांची अंगझडती घेतली असता साहील शेख याच्याकडे धारदार लोखंडी चाकू, तर सद्दाम शेख याच्याकडे गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल, मॅगझिन आणि ५ जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी तात्काळ सर्व शस्त्रे व वाहन जप्त केले.
<span;>या प्रकरणी वानवडी पोलीस स्टेशन येथे गु.र. नं. २१६/२०२६ अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३(२५), ४(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक करीत आहेत.
<span;>ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) श्री. मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ-५ श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्रीमती नम्रता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती संगीता जाधव यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख तसेच तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

