पुणे शहरातील गुन्हेगारी, नशा, सायबर धोके रोखण्यासाठी पोलिसांचा पुढाकार” सेक्युर होरिझन २०२५’ महासंकल्प”
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस.
पुणे | दि. १९ नोव्हेंबर २०२५ पुणे शहरात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाढती गुन्हेगारी, नशेचे व्यसन, कॅम्पस शिस्तभंग, सायबर धोक्यांपासून महिला सुरक्षेपर्यंत विविध गंभीर समस्यांवर विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी “सेक्युर होरिझन इन एज्युकेशन २०२५” या उपक्रमाचे आयोजन पुणे शहर पोलिसांकडून करण्यात आले…
मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमाला पुणे व परिसरातील एकूण ६५ शैक्षणिक संस्थांचे विश्वस्त, पदाधिकारी, प्राचार्य तसेच विविध स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी, विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी व माध्यमांचे प्रतिनिधी मिळून सुमारे ३५० जण उपस्थित होते.
पुणे शहरद्वारे “सेक्युर होरिझन इन एज्युकेशन २०२५” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, ज्याचा उद्देश शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील वाढती गुन्हेगारी, नशेचे प्रकरण, परिसरातील शिस्त आणि सायबर सुरक्षेबाबत जागृती करणे आहे.
विद्यार्थ्यांकडून मुद्देसूद PPT सादरीकरण…
कार्यक्रमात विविध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सामाजिक सुरक्षेशी निगडित विषयांवर PPT द्वारे मार्गदर्शन केले—
सिंबायोसिस कॉलेज – वुमन सेफ्टी
एम.आय.टी. कॉलेज – कॅम्पस व परिसर शिस्त
फर्ग्युसन कॉलेज – मेंटल हेल्थ
जाधवर कॉलेज – नशा व अंमली पदार्थ प्रतिबंध
आण्णासाहेब मगर महाविद्यालय – सायबर सुरक्षा
एस.एन.डी.टी. कॉलेज – रोड सेफ्टी अवेअरनेस
आगामी एक वर्षात या विषयांवर पुण्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये विशेष कार्यशाळा घेण्याचे ठरविण्यात आले.
उद्देश : सुरक्षित, जागरूक आणि जबाबदार विद्यार्थी घडविण्याचा प्रयत्न…
या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थी समुदायामध्ये—
✔ गुन्हेगारी प्रवृत्तींवर नियंत्रण
✔ नशेपासून दूर ठेवणे
✔ कॅम्पस शिस्तबद्धता
✔ महिला सुरक्षा
✔ मानसिक आरोग्य जागरूकता
✔ सायबर सुरक्षा कौशल्य
✔ रस्ते सुरक्षा
याबाबत जाणीव निर्माण करणे हा आहे.
पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही उपस्थिती उल्लेखनीय होती. मा. पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली मा. अपर पोलीस आयुक्त श्री. संजय पाटील, श्री. मनोज पाटील, श्री. पंकज देशमुख तसेच विविध परिमंडळांचे पोलीस उप-आयुक्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन गुन्हे शाखेतील भरोसा सेलने केले.
सुत्रसंचालन
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन स्नेहल दामले व कंचन दूधमल यांनी केले.



