बांगलादेशी अल्पवयीन मुलीला काम देण्याचे आमिष देऊन वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणारे दोघे अटक..
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
बांगलादेशातून अल्पवयीन मुलींची तस्करी करून त्यांना भारतात, विशेषत: पुणे मुबंई देशातील मोठया शहरात जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पडले जाते तसेच गरिबी आणि चांगल्या आयुष्याचे आमिष दाखवून, तसेच कधीकधी थेट अपहरण करून या अल्पवयीन मुलींना भारतात आणले जाते. त्यानंतर त्यांना वेश्यालयांमध्ये विकले जाते किंवा देहविक्रय करण्यासाठी धमकावले जाते. अश्या प्रकारे सहकार नगर पोलिसांनी
दिनांक १०/०७/२०२५ रोजी फिर्यादी यांनी यातील निर्भया हिला तिची मावस बहिण नामे तमन्ना ऊर्फ पारुल मुक्तार शेख, वय अंदाजे २५ वर्षे, हिने खोटे बोलून, बांगलादेश येथुन बेंगलोर येथे बोलावून, बेंगलोर येथे येण्यास भाग पाडून तेथे आल्यावर धमकावून तेथे एका इसमाच्या मार्फतीने स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी वेश्या व्यवसाय करवुन घेतला.
सदर इसमाच्या मार्फतीने निर्भया हिस बेंगलोर वरुन बुधवार पेठ, पुणे येथे येण्यास भाग पाडून, मित्र नामे अभिषेक प्रकाश संथेबेन्नुर याच्या सहभागाने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्या व्यवसाय करण्यासाठी भाग पाडले आहे. तेव्हा निर्भया हीने सदर वाईट काम करण्यासाठी नकार दिला असता, तिला एका रुममध्ये कोढून ठेवून, तिला हाताने व बेल्टने मारहाण करुन, शिवीगाळ करुन गायब करण्याची धमकी दिली. सदर बाबत सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. २८५/२०२५ भा.न्या.सं.क. १४२,१४३ (२),११८ (१),११५(२), ३ (५), बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,६,१७ पीटा अॅक्ट ४,५,६ पारपत्र (भारतामध्ये प्रवेश) १९५० चे कलम ३ (a), ६(a) सह विदेशी व्यकती अधिनियम १९४६ चे कलम १४ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्हयाचा तपासात वरील महीला व इसमास ताब्यात घेवुन त्यांची नावे पत्ता विचारता त्याने त्याचे नाव १) अभिषेक प्रकाश संथेबेन्नुर वय २२ वर्ष, गोपानकोपा, सित्तप्पा मंदिराजवळ, हुबळी, धारवाड, कर्नाटक २) तमन्ना मुख्तार शेख रा. मामा फेंके येथे पहिल्या मजल्यवर खादीजा खातुन यांचे घरी भाडेतत्वावर पुणे असे असल्याचे सांगीतले. त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता सदर गुन्हाची कबुली दिल्याने सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-२, पुणे शहर श्री. मिलींद मोहीते, मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर श्री. राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहकारनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री. राहुल गौड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती सुरेखा चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सागर पाटील, पोलीस उपनिरीक्षक कल्पना काळे, पोलीस अंमलदार फिरोज शेख, सद्दाम हुसेन फकिर, मिरा किंद्रे व तपास पथकाचे अंमलदार यांनी केली आहे.




https://shorturl.fm/XGoZZ
Thank sar