(RTE) राईट टू एज्युकेशन कायदयाचा दिखाऊपणा सांगणारा वास्तववादी “निबार” चित्रपटला उत्फुर्स प्रतिसादात…
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
नुकत्याच संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित झालेल्या ध्रुव फिल्म्स आणि इंटेरटेनमेंट निर्मित व सुनील शिंदे लिखित व दिग्दर्शित निबार हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला आहे.निबार या चित्रपटात शाळाबाह्य मुलांचे खूप वास्तव दाखवण्यात आले आहे. RTE म्हणजेच राईट टू एज्युकेशन act या विषयाला लेखकाने हात घातला आहे आणि हा कायदा सर्वसामान्य लोकांपर्यंत प्रभावीपणे पोचवण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे.
चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर अनेकांच्या मनात हजारो प्रश्न निर्माण झालेत. मनोरंजन तर आहेचं पण शिक्षण किती महत्वाचे आहे व आजही सामान्य गरीब वंचित मुलांना परिस्थिती मुळे शिक्षण घेता येत नाही. सामान्य घरातील मुलांची शिक्षणासाठीची धडपड व परिस्थिती मुळे करावा लागणार संघर्ष दिग्दर्शक शिंदे यांनी दाखवण्यासाठी केलेली अतोनात मेहनत चित्रपट पाहिल्यावर दिसून येते. ध्रुव फिल्म्स अँड एंटरटेन्मेंटच्या बॅनरखाली निर्माते संतोष भणगे, अनिकेत माळी आणि भरत सावंत यांनी ‘निबार’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे सहनिर्माते जितेंद्र भास्कर ठाकरे असून, दिग्दर्शनाची जबबदारी सुनील शिंदे यांनी सांभाळली आहे.
या चित्रपटात होणार सून मी या घरची या झी TV वरील प्रसिद्ध मालिकेतील शशांक केतकर, नाळ फेम अभिनेत्री देविका दफ्तरदार, खोडा फेम शशांक शेंडे, काहे दिया परदेस फेम सायली संजीव आणि ऑस्कर साठी निवडला गेलेल्या श्वास या चित्रपटातील मुख्य अभिनेते अरुण नलावडे व राजेश दुर्गे यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत.
या चित्रपटाने आत्तापारेंत अनेक मोठ्या फिल्म फेस्टिवल मध्ये उत्कृष्ट चित्रपटा सहित , उत्कृष्ट लेखन, दिग्दर्शन, अभिनय असे अनेक पुरस्कार हि पटकवले आहेत.
सुनील शिंदे हे गेली 20 वर्ष चित्रपट क्षेत्रात लेखक दिग्दर्शक व नृत्य दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत. त्यांनी ह्या आधी अनेक चित्रपटांसाठी, TV सीरिअल साठी लेखक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. या चित्रपटाच्या कथा रिसर्च साठी प्रदीप कांबळे यांनी विशेष सहकार्य केले असून अत्यंत अभ्यासपूर्ण हि कथा बांधली गेली आहे. पटकथा संवाद राजेश दुर्गे व सुनील शिंदे यांनी केले आहे. गीतकार वैभव देशमुख, संगीतकार रोहित नागभिडे यांचे असून आदर्श शिंदे व रोहित राऊत यांनी गाणी गायली आहेत. श्वेता हटनागर यांनी सहाय्यक दिदार्शनाची जाबाबदारी पार पडली आहे.
या निमित्ताने RTE सारखा कायदा तळागाळातील लोकांपासून ते उच्च पदस्थ लोकांपारेंत अधिक प्रभावीपणे मांडण्याचे काम दिग्दर्शक सुनील शिंदे यांनी केले आहे.
तरी हा सिनेमा शिक्षक आणि समाजमनाच्या लोकांनी नक्की पहायाला हारकत नाही….



