बुद्ध पौर्णिमा पहाटेच्या मंगलमय वातावरणात बुद्धगिताने व भीमगीताने रंगली भव्य धम्म पहाट…


पुणे प्रतिनिधी :- कांबळे

पुणे शहरातील उपनगरात बिबवेवाडी परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानात सोमवार दिनांक 12 मे बुद्ध पौर्णिमे निमित्त पहाटेच्या मंगलमय वातावरणात ग्राहक हक्क संघर्ष समिती, नक्षत्र नऊवारी, सांची चहा , यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य धम्म पहाट आयोजन करण्यात आले…

बिबवेवाडी परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान अप्पर 276 ओटा येथे बुद्ध पौर्णिमेच्या पहाटे “बुद्धम् शरणम् गच्छामि ” आर्केस्ट्रा प्रसिद्ध गायक भिमाचा किल्ला फेम येवले बंधू व महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुया घे पोत घे फेम प्रदीप कांबळे यांच्या सु मधुर आवाजाने मंत्रमुध केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसर पंचशील ध्वजांनी बहरून गेला होता. कार्यक्रमात परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
धम्म पहाट कार्यक्रमाची सुरवात बौद्धाचार्य मा. आयु धर्मा गरड गुरुजी यांनी सामूहिक बुद्ध वंदना व त्रिशरण पंचशील पठणाने केली. बौद्धाचार्य धर्मा गरड यांनी तथागत गौतम बुद्धांचे विचार व बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व कथन केले. परिसर बुद्धभिम गीतांनी बहरून गेला.

Advertisement

प्रमुख पाहुणे बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री शंकर साळुंखे व साम टीव्ही न्यूज चॅनेल चे पत्रकार मा.श्री सागरजी आव्हाड, पत्रकार मा. श्री किरण कांजले, वंचित बहुजन आघाडी चे पार्वती विधानसभा अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. रवीभाऊ गायकवाड, उदयोजक मा.श्री अमोल शेठ घुगे, पंचशील बुद्ध विहाराचे अध्यक्ष सतिश जानराव, दांडेकर पूल परिसरातील सामाजिक मा श्री तानाजी वाघमारे सर, व इतर अनेक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजक ग्राहक हक्क संघर्ष समिती चे अध्यक्ष मा.मिलिंद राजहंस व नक्षत्र नऊवारीचे उदयोजक मा.गणेशशेठ तुम्मा, सांची चहा चे मा.माणिकशेठ लोंढे यांनी आलेल्या यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले.
तसेच आलेले प्रमुख पाहुणे, कलाकार, व परिसरातील नागरिकांचे आयोजक ग्राहक हक्क संघर्ष समिती चे अध्यक्ष मा.मिलिंद राजहंस यांनी आभार व्यक्त केले…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!