पुणे शहरात विविध ठिकाणी चैन, मंगळसूत्र, मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ…


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

पुणे शहरात दि .15/07/24 ते 16/07/24 रोजी बिबवेवाडी ,स्वारगेट परिसरात वयस्कर महिला, पुरुषांना पायी चालणाऱ्या लोकांना हेरून शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन मोटारसायकल धारक चोरटयांनी चैन ,मंगलसूत्र, मोबाईल , बॅग मधील कागतपत्रे पैसे चोरून पळ काढला …

बिबवेवाडी पोलीस स्टेशन परिसरात दि.१५/०७/२०२४ रोजी रात्रौ 9 ते 10 वा.चे सुमा. चामुण्डा व्हरायटीज समोर सार्वजनिक रोडवर सुखसागरनगर कात्रज पुणे येथे यातील फिर्यादी व त्यांचे पती वर नमुद ठिकाणी पायी जात असताना, नमुद अज्ञात इसमांनी दुचाकीवरून त्यांचे जवळ येवुन, फिर्यादी यांचे गळयातील १,७५,०००/-रू कि.चे सोन्याचे मंगळसुत्र जबरी चोरी करून नेले. बिबवेवाडी पो.स्टे.१७१/२०२४, भा.न्या.सं कलम ३०९ (४),३ (५) अन्वेय अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहा. पो. निरी. काळोखे पुढील तपास करत आहेत.

Advertisement

तसेच स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत दि.१६/०७/२०२४ रोजी स.०९/०० वा.चे सुमा. लक्ष्मीनारायण चौक साबळे हाऊस स्वारगेट पुणे येथे यातील फिर्यादी हया वर नमुद ठिकाणाहुन पायी जात असताना, नमुद इसमांनी दुचाकीवरून त्यांचे जवळ येवुन, फिर्यादी यांचे गळ्यातील सोन्याची चेन १७,४००/- रु.कि.ची जबरी चोरी करून सदर ठिकाणी दहशत निमार्ण केली. स्वारगेट पो स्टे २७३/२०२४, भान्यासं कलम ३०९ (१), ३ (५) क्रिमीनल लॉ अमेंन्डमेंट अॅक्ट क.३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला
दि.१६/०७/२०२४ रोजी दुपारी 3 ते 4 वा. गिरीधर भवन चौक स्वारगेट पुणे येथे यातील फिर्यादी हे वर नमुद ठिकाणाहुन जात असताना, नमुद इसम हे दुचाकीवरून फिर्यादी यांचे जवळ येवुन, फिर्यादी यांचे हातातील १७,४००/- रु.कि.चा मोबाईल व इतर महत्वाची कागदपत्रे असा ऐवज जबरी चोरी करुन घेवुन गेले. अज्ञात इसमावर स्वारगेट पो स्टे २७४/२०२४, भा.न्या.सं कलम ३०९ (४),अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला
पो.उप.निरी. अशोक येवले तपास करीत आहेत


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!