पुणे विमानतळाच्या रन-वेचा विस्तार करण्यासाठी सहकार व नागरी उड्डाण मंत्री खासदार मुरलीधर मोहोळ केले बैठकीचे आयोजन …
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
पुणे शहराचे खासदार सहकार व नागरी उड्डाण मंत्री खासदार मुरलीधर मोहोळ केले बैठकीचे आयोजन करण्यात आले. या वेळी पुणे शहर परिसरात असलेल्या एकमेव विमानतळा चे अनेक प्रश्न आहेत या बाबत बैठकीत चर्चा करण्यात आली…

पुणे विमानतळाच्या विविध विषयांसंदर्भात आज संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेत आवश्यक त्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
पुण्यातून आंतरराष्ट्रीय विमान सेवा वाढविण्यासाठी रन-वेचा विस्तार करण्यात येणार असून यासाठी मोठ्या प्रमाणार जागा आवश्यक आहे. सदरील जागा काही खासगी आणि काही शासकीय मालकीच्या आहेत. याचे लवकरात भूसंपादन करण्यात येईल. या भूसंपादनासाठी आता नागरी नागरी हवाई उडाण मंत्रालय, एमओडी आणि एमएडीसी यांची एकत्रित बैठक घेणार आहे. यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची लवकरच भेट घेतली जाईल आणि पुणे विमानतळाच्या रन-वेचा विस्तार करण्यात येणार आहे.
धावपट्टीची लांबी वाढविण्यासाठी हवाई दल आणि खासगी जागेचे भूसंपादन करण्यात येणार आहे. यासाठी जवळपास १६० कोटी रुपये अपेक्षित खर्च
यासाठी जवळपास १६० कोटी रुपये अपेक्षित खर्च आहे. यामध्ये राज्य सरकार ६० टक्के, पुणे महापालिका २० आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीए १० टक्के खर्च देणार आहे.
नव्या टर्मिनलची प्रतिक्षाही लवकरच संपणार असून प्रवाशी सुरक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या सीआयएफएस जवानांचे मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येणार आहे.
धावपट्टीचा विस्तार झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय आणि मोठ्या विमानांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे पुण्यातून जाणार्या प्रवासी क्षमता वाढण्यासाठी फायद्याचे ठरेल. सध्या सध्या पुण्यातून बोईंग, एअरबस ए ३१९, २० यांसारख्या विमान धावतात. धावपट्टीचे विस्तार झाल्यावर येथून ड्रीम, एअरबस ३५० असे विमाने धावू शकतात. यामुळे थेट आंतरराष्ट्रीय प्रवास होऊ शकतो.असे मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटर द्वारे सांगितले



