आळंदी समिती कडून पालखी तळाची पाहणी


सासवड (प्रतिनिधी) श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर २९/०६/२०२४ ते ३१/०७/२०२४ या. दरम्यान संपन्न होणार आहे. संत शिरोमणी महाराज पालखी सोहळा सासवड येथे दोन दिवस मुक्कामी येत असल्याने त्या अनुषंगाने सुविधा बाबत नियोजन करण्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज, आळंदी कमिटी च्या विश्वस्थ व पालखी सोहळ्यातील प्रमुखांनी सासवड येथील पालखी तळाला भेट देऊन पाहणी केली.

Advertisement

त्या बाबत त्यांनी काही सूचना केल्या त्या मध्ये दर्शन रांगांचे बॅरिकेट नियोजन व पाण्याचे नियोजन करण्याबाबत मुख्याधिकारी यांना सूचना दिल्या.
सदर सोहळ्या समवेत आळंदी कमिटीचे प्रमुख अड. राजेंद्र उमप, पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजन नाथ, पालखी सोहळ्याचे राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब आरफळकर, व्यवस्थापक ज्ञानेश्वर विर, मारुती कोकाटे, प्रदीप भूमकर तसेच पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप, तहसिलदार डॉ. शैलेजा पाटील, सासवड नगरपालिकेचे डॉ. कैलास चव्हाण, माजी उपाध्यक्ष यशवंतकाका जगताप, माजी नगरसेवक अजित जगताप व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!