“पुणे पोलिसांची झडप – गजा मारणे टोळीचा कुख्यात गँगस्टर रुपेश मारणे अखेर अटकेत”


पुणे प्रतिनिधी :- गणेश तुम्मा

पुणे : कोथरुड पोलीस स्टेशन, पुणे शहरच्या पथकाने गजा मारणे टोळीतील कुख्यात पाहिजे आरोपी रुपेश कृष्णराव मारणे (वय ४१, रा. नवएकता कॉलनी, हमराज चौक, शास्त्रीनगर, कोथरुड, पुणे) यास अटक केली आहे. गु.र.नं. ४६/२०२५ अन्वये भारतीय दंड संहिता व महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) आरोपीवर गंभीर गुन्ह्यांची नोंद होती.गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित करण्यासाठी गजानन मारणे आणि त्याच्या साथीदारांनी कोथरुड व परिसरातील नागरीकांना मारहाण, गंभीर जखमी करणे, घरफोडी, चोरी, मालमत्तेचे नुकसान, घातक शस्त्र बाळगणे, शांतता भंग करणे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची मालिका रचली होती. या सर्व गंभीर प्रकरणात आरोपी रुपेश मारणे सुमारे ९ महिन्यांपासून फरार होता, आणि पुणे शहरासह विविध स्तरावर त्याचा शोध सुरु होता.दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ रोजी गोपनीय माहितीच्या आधारे, कोथरुड पोलिसांनी आंदगाव, ता. मुळशी, जि. पुणे येथे छापा टाकून आरोपीला स्वतःच्या बेडरूममध्ये लपलेला अवस्थेत पकडले. पुढील तपास सहा पोलीस आयुक्त श्री. विजय कुंभार यांच्या देखरेखीखाली सुरू असून, आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.सदर कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री. राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-३, श्री. संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग, श्री. भाऊसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप देशमाने यांच्या सूचनेनुसार पोलीस अंमलदार अंबादास लोखंडे, संजय दहिभाते, अजय शिर्के व सोमनाथ हुलगे यांनी केली.


One thought on ““पुणे पोलिसांची झडप – गजा मारणे टोळीचा कुख्यात गँगस्टर रुपेश मारणे अखेर अटकेत”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!