पुणे जिल्हा सत्र न्यायालय ने हुंडाबळीच्या गुन्ह्यातील आरोपींना सात वर्षे सश्रम कारवासाची शिक्षा…


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

परिमंडळ ५ मधील हडपसर पोलीस ठाणे अंतर्गत हुंडाबळीच्या गुन्ह्यातील आरोपींना सात वर्षे सश्रम कारवासाची शिक्षा पुणे सत्र न्यायालयाने सुनावली आरोपी १५ नंबर, मनिष सुपर मार्केटमागे, लक्ष्मी कॉलनी, हडपसर, परिसरातील असून आरोपीस भादवि कलम 498 (A), 304 (B), 34 मध्ये आरोपी*-
1. संतोष पवार वय 42 वर्ष, रा. पुणे
2. विठ्ठल पवार वय 71 वर्षे रा. पुणे
3. ⁠मंगल पवार वय 65 वर्षे रा. पुणे
दोषी ठरवुन *सात वर्षाची सश्रम कारावास व आठ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावासची शिक्षा सुनावली…

सदर घटना ही १५ नंबर, मनिष सुपर मार्केटमागे, लक्ष्मी कॉलनी, हडपसर, पुणे येथे दिनांक ३०/११/२०१२ ते दिनांक २५/०५/२०१३ रोजीच्या दरम्यान घडली आहे. यातील आरोपी १) संतोष विठ्ठल पवार (पती), रा. १५ नंबर, मनिष सुपर मार्केटमागे, लक्ष्मी कॉलनी, हडपसर, पुणे २) विठ्ठल तुकाराम पवार (सासरे) व ३) सौ. मंगल विठ्ठल पवार (सासू) यांनी लग्नात राहिलेली भांडी, दोन तोळे सोने, कुलर, फ्रिज, पिठाची गिरणी इ. वस्तू दिले नसल्याने ते घेऊन येण्याकरीता हुंड्यासाठी मानसिक व शारिरीक छळ करुन मारहाण करीत होते. त्यामुळे दिनांक २५/०५/२०१३ रोजी मयत सविता संतोष पवार हिने राहते घरी सततच्या होणाऱ्या छळाला कंटाळून अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन मयत झाल्याने हडपसर पोलीस ठाणे, पुणे शहर येथे गुन्हा क्रमांक २१५/२०१३ भा.दं.वि. कलम ४९८ (अ), ३०४(ब), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Advertisement

तपास

सदर गुन्हयाचा तपास श्री. बी.एम. पवार, पोलीस उप निरीक्षक यांनी केला व यातील आरोपींविरुद्ध मा. न्यायालयामध्ये मुदतीत दोषारोपपत्र सादर केले. सदर केसचा सेशन केस क्र. ९२४/२०१३ असा आहे.

शिक्षा

वरील प्रकरणामध्ये सबळ साक्षीपुराव्याअंती मा. जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांनी आरोपींना दिनांक ३०/०१/२०२५ रोजी सात वर्षे सश्रम कारावास व ८ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे…

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!