स्व. अंबरचंदजी मुनोत शिक्षण संस्थाच्या शिक्षकांन कडून संचालक अशोक मुनोत पिता, पुत्राने केली खंडणीची वसुली गुन्हा दाखल….


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस


पुणे शहराला विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते.याच पुणे शहरात काही40 ते 100%अनुदानित शिक्षण संस्था आहेत राज्य सरकार या अनुदानातून शिक्षकांचे पगार विद्यार्थ्यांचा खर्च इमारत खर्च भगवण्या साठी देत असते असे असताना चक्क शिक्षकांच्या पगारावर डल्ला मारण्याचा प्रकार स्व. अंबरचंदजी मुनोत शिक्षण संस्था संचलित, मुनोत प्राथमिक विद्यालय व स्व.सौ.झुंबरबाई मुनोत माध्यमिक विद्यालय कात्रज, पुणे या संस्थेने केला असल्याचे समोर आले आहे. तसेच या संस्थे चे संचालक संस्थापक अध्यक्ष अशोक मुनोत व पुत्र संस्थेचे सचिव निखिल मुनोत, संस्थेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी हर्षदा मुनोत ऊर्फ गुगळे, माध्यमिक मुख्याध्यापिका सुरेखा सुतार व प्राथमिक मुख्याध्यापिका उल्का नवगिरे यांच्यावर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल झाला आहे.

कात्रज पुणे शहरात स्व. अंबरचंदजी मुनोत शिक्षण संस्था संचलित, मुनोत प्राथमिक विद्यालय व स्व.सौ.झुंबरबाई मुनोत माध्यमिक विद्यालय कात्रज, पुणे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक मुनोत, सचिव निखिल मुनोत, संस्थेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी हर्षदा मुनोत ऊर्फ गुगळे, माध्यमिक मुख्याध्यापिका सुरेखा सुतार व प्राथमिक मुख्याध्यापिका उल्का नवगिरे हे गेल्या १० ते १२ वर्षांपासून येथील कर्मचारी व शिक्षकांची शारीरिक, मानसिक, आर्थिक व पिळवणूक करत आहेत. या अन्यायाविरोधात शिक्षण विभागाला सर्व शिक्षक यांनी दि.१७/०५/२०२३ रोजी तक्रार अर्ज, विनंती अर्ज व वारंवार स्मरणपत्रे देऊनही शिक्षण विभागाने आज पर्यंत त्यांची कुठलीही दखल घेतली नाही . शेवटी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी या होणाऱ्या अन्यायाविरोधात मिळणाऱ्या वागणुकीबाबत तसेच सहशिक्षक श्री.मल्लिकार्जुन वाडेकर यांच्यावर होणाऱ्या जातीवाचक शिवीगाळ, वेठबिगारी, शिवीगाळ, मारहाण, तसेच ईतर घाणेरडी कामे लावणे, शिक्षकांचे बेकायदेशररित्या मनमानी पद्धतीने निलंबन करुन बडतर्फ करणे, जातीवरून हिणवणे , वारंवार पैश्याची मागणी करणे, कर्मचाऱ्यांना हिनदर्जाची वागणूक देणे, शासकिय सुट्टीच्या दिवशीही शिक्षक, महिला यांना शाळेत बोलावणे, जादा वेळ थांबवणे, नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देणे अशा प्रकारचा अन्याय अशोक मुनोत. निखिल मुनोत व ईतर ही गेल्या अकरा बारा वर्षापासुन सातत्याने करत आहे.असे तक्रारदार शाळेचे शिक्षक ज्ञानोबा साधू सरटे यांनी सांगितले

Advertisement

वारंवार होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून शिक्षकांनी संस्थापक अशोक मुनोत , सचिव निखिल मुनोत , संस्थापक यांची कन्या हर्षदा मुनोत (गुगळे ),प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका उल्का नवगिरे,माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुरेखा सुतार याचेवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच काही दिवसापूर्वी माध्यमिक शिक्षक श्री.वाडेकर मल्लिकार्जून, प्राथमिक शिक्षिका श्रीमती मुप्पिडवार सुप्रिया व अन्य कर्मचाऱ्यांचे बेकायदेशीरपणे या शिक्षकांना बडतर्फ करण्यात आले आहे.सदर विद्यालयातील कर्मचारी गेल्या वर्षभरापासून शिक्षण विभागाकडे न्याय मागत आहेत तरीही शिक्षण विभाग जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत आहे. संस्थापक अशोक मुनोत , सचिव निखिल मुनोत , संस्थापक यांची कन्या हर्षदा मुनोत (गुगळे ), प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका उल्का नवगिरे,
माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुरेखा सुतार, संस्था पदाधिकारी यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याची भावना सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांची आहे.कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत पोलीस प्रशासन दखल घेत असून अद्याप पर्यंत शिक्षण विभागामार्फत आजही दखल का घेतली जात नाही? याबाबत मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण दीड वर्ष होऊनही शिक्षण विभागामार्फत संस्था व शाळेविषयी चौकशी होऊनही शिक्षण विभाग दखल का घेत नाही?? संस्थाचालक व संस्था पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक यांना शिक्षण विभाग पाठीशी का घालत आहे ? शिक्षण विभाग कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्याने कर्मचाऱ्यांना नाहक निलंबन तसेच बडतर्फ या कारवायांना सामोरे जावे लागत आहे. शिक्षकांनी केलेल्या कारवाईमुळे संस्थापक अशोक मुनोत, निखिल मुनोत व इतर यांच्याकडून त्यांना रस्त्यात अडवून धमकी देणे, शिवीगाळ करणे व त्यांना अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी मदत करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांना धमकवण्याचा, खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्याचे असे प्रकार सुद्धा मुनोत परिवार करत असल्याची माहिती समोर येत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!