महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनामा मंजूर होण्याची शक्यता …


मुबंई प्रतिनिधी :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा देण्यावर ठाम आहेत. आपली भूमिका पक्ष आणि संघटनात्मक बांधणीच्या फायद्याचीच आहे, हे पटवून देण्यावर देवेंद्र फडणवीस ठाम आहेत, त्यामुळे याबाबत आता उद्या दिल्लीत नेमका काय निर्णय होणार? यावर महाराष्ट्राचं पुढचं राजकारण अवलंबून आहे.

महाराष्ट्र भाजप कोअर कमिटी दिल्लीत पक्षनेतृत्वाची भेट घेणार असून, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि महाराष्ट्र प्रभारी बी एल संतोष यांची महाराष्ट्र प्रदेश कोअर कमिटीसोबत बैठक पार पडणार आहे. या बैठकीत महाराष्ट्रात झालेला पराभव, येत्या काळातील रणनिती याबरोबरच देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली भुमिका बाबत चर्चा केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Advertisement

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात बसलेल्या धक्क्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली होती. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मला मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मोकळं करा, असं फडणवीस म्हणाले होते, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेटही घेतली होती.
यानंतर आता फडणवीसांच्या राजीनाम्याच्या तयारीबाबत मोठी अपडेट समोर येत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा देण्यावर ठाम आहेत. आपली भूमिका पक्ष आणि संघटनात्मक बांधणीच्या फायद्याचीच आहे, हे पटवून देण्यावर देवेंद्र फडणवीस ठाम आहेत, त्यामुळे याबाबत आता उद्या दिल्लीत नेमका काय निर्णय होणार? यावर महाराष्ट्राचं पुढचं राजकारण अवलंबून आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!