‘दृश्यम ३’चा रिअल लाईफ व्हर्जन पुण्यात — नवऱ्यानेच केली पत्नीची हत्या, मिसिंगचा बनाव…
पुणे प्रतिनिधी :- गणेश तुम्मा
पुणे वारजे परिसरात “दृश्यम ३”सारखा गुन्हा आखून पोलिसांना चकवण्याचा प्रयत्न अखेर फसला!
वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका मिसिंग प्रकरणाचा तपास ‘दृश्यम’ चित्रपटासारखा वळण घेत पोलिसांनी खुनाचा उलगडा केला आहे. पत्नी हरवल्याची तक्रार करणाऱ्या पतीनेच तिचा खुन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
२८ ऑक्टोबर २०२५ रोजी वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेच्या हरवल्याची तक्रार दाखल झाली होती. तक्रारदार समीर पंजाबराव जाधव (वय ४२, रा. शिवणे, पुणे) यांनी पत्नी हरवल्याचे सांगितले होते. मात्र चौकशीदरम्यान समीरच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पुढील तपास राजगड पोलीस स्टेशनकडे वर्ग केला गेला.
तपासादरम्यान पोलीस पथकाने जाधव याची सखोल चौकशी केली असता त्याने अखेर पत्नीच्या संशयावरून खुन केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्यावर वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंडसंहिता कलम १०३ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून प्रकरण पुढील तपासासाठी राजगड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई मा. पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलिस आयुक्त भाऊसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तपास पथकात पोलिस उपनिरीक्षक संजय नरळे, नितीन गायकवाड तसेच पोलिस कर्मचारी गणेश कर्चे, सुनिल मुठे, योगेश वाघ, शरद पोळ व शिरीष गावडे यांनी सहभाग घेतला.



