क्रीडा Archives - Grahak Jagruti News

गॅस टंचाईत काळाबाजार फोफावला; पुण्यात १०३ सिलेंडरसह मोठी कारवाई!
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस….

इराण–अमेरिका–इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात गॅस टंचाई निर्माण झाल्याचा गैरफायदा घेत काही टोळ्या अवैधरित्या गॅस साठवणूक व विक्री करत असल्याची माहिती समोर येत होती. याच पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पुणे शहरातील हांडेवाडी परिसरात घरगुती गॅसचा अवैध साठा करून काळाबाजार करणाऱ्या इसमावर काळेपडळ पोलीसांनी मोठी कारवाई करत तब्बल १०३ गॅस सिलेंडर आणि चारचाकी वाहनासह आरोपीस अटक केली आहे.

काळेपडळ पोलीस स्टेशन हद्दीत विशेष तपास व पेट्रोलिंग सुरू होते.

दरम्यान, पोलीस अंमलदार महादेव शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हांडेवाडी परिसरातील काव्या मल्टी सर्व्हिसेस येथे छापा टाकण्यात आला. छाप्यात एक इसम घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक व ५ किलोच्या सिलेंडरमध्ये गॅस ट्रान्सफर करत असल्याचे उघड झाले. ही प्रक्रिया अत्यंत धोकादायक असून मानवी जीवितास गंभीर धोका निर्माण करणारी आहे.

पोलिसांनी आरोपी नितीन हनुमंत होळकर (वय ३८, रा. हांडेवाडी, पुणे) यास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याच्याकडे कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत १०३ गॅस सिलेंडर व एक मारुती सुझुकी सुपर कॅरी टेम्पो असा एकूण सुमारे १०,०९,३००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर प्रकरणी काळेपडळ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १६४/२०२६ अंतर्गत अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही धडाकेबाज कारवाई पोलीस उपआयुक्त (परिमंडळ ६) श्री. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग श्री. अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मानसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक अमित शेटे तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली.

गॅस काळाबाजार करणाऱ्यांवर पोलिसांचा कडक इशारा – “अवैध साठा व विक्री सहन केली जाणार नाही!”

The post गॅस टंचाईत काळाबाजार फोफावला; पुण्यात १०३ सिलेंडरसह मोठी कारवाई! appeared first on Grahak Jagruti News .

कोट्यवधींच्या संपत्तीचा खेळ? भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे…
पुणे प्रतिनिधी :- गणेश तुम्मा…

महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या कॅप्टन अशोक खरात उर्फ भोंदू बाबा प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, त्यांच्या कथित बेनामी संपत्तीबाबत गंभीर आरोप समोर आले आहेत. आयकर विभागाच्या (बेनामी प्रॉपर्टी) कक्षाकडे या प्रकरणाची तक्रार आनंद राजहंस यांनी दाखल केली असून, उत्पन्नाच्या मानाने मोठ्या प्रमाणात संपत्ती जमा केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, KARMA Construction LLP या कंपनीचे संचालक आकाश चौधरी आणि निलेश चाकणकर यांचा या व्यवहारात सहभाग असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच Geeta Agro & Infrastructure Pvt. Ltd. आणि Multiventure Estates Private Limited या कंपन्यांमधील काही व्यवहारांवरही संशय व्यक्त करण्यात आला आहे. या कंपन्यांमध्ये पूर्वी काही राजकीय व्यक्तींचा सहभाग असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय, रायगड जिल्ह्यातील काही प्रभावशाली राजकीय व्यक्तींनी पडद्यामागून आर्थिक व्यवहारात मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. बाळगंगा प्रकल्पातील जमीन खरेदी व्यवहार आणि कथित सिंचन घोटाळ्यातील निधीचा वापर करून काळा पैसा पांढरा करण्यात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

तक्रारदारांनी सांगितले की, या प्रकरणात केवळ अशोक खरात यांच्याच भूमिकेचा तपास न करता, त्यांच्या माध्यमातून कोण राजकीय किंवा आर्थिक फायदा घेत आहे का, तसेच ब्लॅकमेलिंगसारखे प्रकार होत आहेत का, याचाही सखोल तपास करावा.

सुमारे सात महिन्यांपूर्वी बाळगंगा प्रकल्पातील जमीन खरेदी प्रकरणी करण्यात आलेल्या तक्रारीवर सध्या चौकशी सुरू असून, कर्जत तालुक्यातील काही नेत्यांचाही तपास सुरू असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.

तक्रारदारांनी सांगितले की, विविध सामाजिक संघटना, महिला संघटना आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचा पाठिंबा त्यांना मिळत असून, येत्या सहा ते सात दिवसांत पत्रकार परिषद घेऊन सर्व पुरावे आणि माहिती जनतेसमोर मांडण्यात येणार आहे.

दरम्यान, अशा प्रकारांमुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला धक्का बसत असल्याची भावना व्यक्त करत, संबंधित प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणण्याची मागणी करण्यात येत आहे….

The post कोट्यवधींच्या संपत्तीचा खेळ? भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे… appeared first on Grahak Jagruti News .

“10 वी बोर्ड पेपरफुटीची अफवा; टेलिग्रामवरील चलाख ट्रिक उघड, आरोपीचा धक्कादायक खुलासा”
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस…

पुणे शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत 10 वी महाराष्ट्र बोर्ड परीक्षेचा पेपर लीक झाल्याचा बनाव करून विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका तरुणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. टेलिग्राम अ‍ॅपवरील तांत्रिक “Replace” ट्रिक वापरून विद्यार्थ्यांना पेपर आधीच लीक झाल्याचा आभास निर्माण करण्यात आला होता. या प्रकारामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीती व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिस तपासात चैतन्य विनोद शेंडे (वय १८) या आरोपीने अत्यंत चलाख पद्धतीने विद्यार्थ्यांना गंडा घातल्याचे कबूल केले आहे. आरोपी टेलिग्रामवरील ग्रुपमध्ये पासवर्ड प्रोटेक्टेड PDF फाईल अपलोड करून “माझ्याकडे उद्याच्या परीक्षेचा प्रश्नपत्रिका पेपर आहे” असा दावा करत होता. तो विद्यार्थ्यांकडून सुमारे ₹600 आकारून पेपर देण्याचे आमिष दाखवत असे.

अशी रचली होती फसवणुकीची योजना

पोलिस तपासात या संपूर्ण फसवणुकीची पद्धत समोर आली आहे –

परीक्षेच्या एक दिवस आधी आरोपी टेलिग्राम ग्रुपमध्ये पासवर्ड प्रोटेक्टेड PDF फाईल अपलोड करत असे.

त्यानंतर “उद्याचा पेपर माझ्याकडे आहे” असा दावा करून ₹600 मध्ये पेपर देण्याची ऑफर दिली जात असे.

काही विद्यार्थ्यांनी पैसे पाठवल्यानंतर आरोपी त्यांना तात्काळ ब्लॉक करत असे.

परीक्षा संपल्यानंतर आरोपी खरी प्रश्नपत्रिका मिळवून आधी अपलोड केलेली PDF फाईल ‘Replace’ करत असे.

त्यामुळे टेलिग्रामवर पेपर आधीच अपलोड केला होता असा खोटा पुरावा तयार होत असे.

‘Replace’ ट्रिकमुळे निर्माण झाला खोटा कालक्रम

पोलिसांच्या माहितीनुसार, टेलिग्राममध्ये एकदा अपलोड केलेली फाईल नंतर बदलली तरी मूळ अपलोडची वेळ (टाइमस्टॅम्प) तशीच राहते आणि फक्त “Edited” असा उल्लेख दिसतो. या तांत्रिक सुविधेचा गैरवापर करून आरोपीने पेपर आधीपासूनच त्याच्याकडे असल्याचा खोटा आभास निर्माण केला.

विद्यार्थ्यांना पोलिसांचे आवाहन

या प्रकारामुळे बोर्ड परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोशल मीडियावर फिरणाऱ्या पेपर लीकच्या अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्तीला पैसे पाठवू नयेत, असे आवाहन केले आहे.

या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, अशा प्रकारच्या ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या इतर व्यक्तींचा शोधही पोलीस घेत आहेत…

The post “10 वी बोर्ड पेपरफुटीची अफवा; टेलिग्रामवरील चलाख ट्रिक उघड, आरोपीचा धक्कादायक खुलासा” appeared first on Grahak Jagruti News .

पदपथ मोकळे होणार का? ‘जागल्या’ संकल्पनेने पुणेकरांना दिलासा?
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस….

पुणे शहरातील पदपथ हे नागरिकांसाठी की अवैध व्यावसायिकांसाठी? असा संतप्त सवाल पुणेकर गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. अतिक्रमण, फेरीवाले, पार्किंग आणि तुटलेले फरसबंदी यामुळे पादचाऱ्यांना अक्षरशः रस्त्यावरून चालावे लागत असल्याचे चित्र शहरभर पाहायला मिळते.

याच पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या वतीने विशेष फुटपाथ दुरुस्ती अभियान सुरू करण्यात आले असून, उद्घाटन प्रसंगी मा. महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे यांनी ‘जागल्या’ ही नवी संकल्पना जाहीर केली आहे.महापौरांच्या माहितीनुसार –

प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात ‘जागल्या’ कर्मचारी नियुक्त केला जाणार.

पुणे शहरातील महापालिकेचा कर्मचारी रोज १ ते २ तास पायी फिरून आपल्या कार्यक्षेत्रातील पदपथांची पाहणी करणार.

फुटपाथवरील अडथळे, अतिक्रमण, तुटलेली फरसबंदी, अडथळे निर्माण करणारे साहित्य याची नोंद घेऊन संबंधित अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करणार.

त्यानुसार तातडीने दुरुस्ती आणि अडथळे दूर करण्याची कारवाई केली जाणार.

महापौरांनी विश्वास व्यक्त केला की, या विशेष अभियानामुळे पादचाऱ्यांना चालणे सुलभ होईल आणि पदपथांचा मूळ उद्देश पूर्ण होईल.

The post पदपथ मोकळे होणार का? ‘जागल्या’ संकल्पनेने पुणेकरांना दिलासा? appeared first on Grahak Jagruti News .

33 वर्षांचा झंझावात संपला! पुणे शहर अभियंता प्रशांत वाघमारे सेवानिवृत्त..
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

पुणे महानगरपालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे हे तब्बल 33 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवेतून निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीच्या निमित्ताने महापालिकेत अधिकारी-कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी उसळली होती.

प्रशासनात कडक शिस्त, वचक आणि निर्णयक्षम नेतृत्व यासाठी ओळखले जाणारे प्रशांत वाघमारे हे असे अधिकारी होते की प्रशासनात वचक होताच, पण नगरसेवकही त्यांना घाबरत!

महापालिकेत असा वजनदार अधिकारी पुन्हा तयार होईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा ‘गेमचेंजर’ अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी महापालिकेत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत बांधकाम विभागासह विविध विभागांची कामे ऑनलाइन पद्धतीने सुरू करून पारदर्शकता आणि गतीमानता वाढवली.

त्यांच्या कार्यकुशल नेतृत्वामुळे पुणे महापालिका ई-गव्हर्नन्समध्ये देशपातळीवर अग्रक्रमी राहिली.

22+ वर्ष शहर अभियंता पदावर ‘विक्रम’

प्रशांत वाघमारे यांनी पुणे महापालिकेत उपअभियंता पदावर 1993 मध्ये रुजू होऊन आपल्या कामाचा ठसा उमटवला.

विशेष म्हणजे त्यांनी 22 वर्षांहून अधिक काळ शहर अभियंता पदावर कार्यरत राहण्याचा विक्रम केला आहे.

या कालावधीत शहरातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प आणि योजना पूर्णत्वास नेण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.

शिक्षण आणि कारकीर्द

🔹 सीईओपी महाविद्यालयातून अभियांत्रिकी शिक्षण

🔹 1990 : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये नोकरीची सुरुवात

🔹 1993 : पुणे महापालिकेत उपअभियंता म्हणून रुजू

🔹 पथ विभागानंतर भवन रचना विभागात महत्त्वाची जबाबदारी

निरोपासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची गर्दी

त्यांच्या सेवामुक्तीच्या निमित्ताने महापालिकेत मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

वाघमारे यांना निरोप देताना अनेकांनी “प्रशासनाचा कणा निवृत्त झाला” अशा भावना व्यक्त केल्या.

The post 33 वर्षांचा झंझावात संपला! पुणे शहर अभियंता प्रशांत वाघमारे सेवानिवृत्त.. appeared first on Grahak Jagruti News .

पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी ‘धडाकेबाज’ महापौर कोण?
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस…

पुणे शहरात वाहतूक, पाणीपुरवठा, प्रदूषण, स्मार्ट सिटी, रस्ते आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस निर्णय घेणारा, प्रशासनावर वचक ठेवणारा आणि पुण्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा महापौर कोण ठरणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

पुणे शहराचा कारभार हाकणारा पुढचा महापौर कोण असणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. महापौर निवडीसाठी निवडणूक आयोगाकडून लवकरच अधिकृत कार्यक्रम जाहीर होणार असून, त्याआधी येत्या २२ जानेवारी रोजी महापौर पदाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. या सोडतीतून पुण्याचे महापौर पद महिलेसाठी की पुरुषासाठी, तसेच कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित राहणार, यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

आरक्षणाची अधिकृत घोषणा होण्याआधीच राजकीय हालचालींना वेग आला असून, पुण्यात सत्ताधारी भाजपमधील काही दिग्गज नेत्यांची नावं महापौरपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. आरक्षण ‘सोयीचं’ सुटलं, तर पक्षालाही या नावांचा गांभीर्याने विचार करावा लागणार, हे निश्चित मानलं जात आहे.

महापौरपदाच्या चर्चेत कोण?

भाजपकडून गणेश बिडकर, राजेंद्र शिळमकर आणि धीरज घाटे ही तीन नावं सध्या सर्वाधिक चर्चेत आहेत.

गणेश बिडकर यांच्या नावाने तर निकालाआधीच शहरात बॅनरबाजी सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

राजेंद्र शिळमकर हे खासदार मुरलीधर मोहोळ यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात.

तर धीरज घाटे, भाजपचे शहराध्यक्ष आणि माजी सभागृह नेते, प्रशासन व संघटनात्मक अनुभवामुळे मजबूत दावेदार मानले जात आहेत.

२२ जानेवारीला निर्णायक दिवस…

नगरविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २९ महापालिकांच्या महापौर पदासाठी २२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मंत्रालयात आरक्षण सोडत काढली जाणार आहे. ही सोडत नगरविकास खात्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. त्यानंतर संबंधित महापालिकांचे आयुक्त महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर करतील आणि पहिल्याच सभेत महापौर निवड होईल.

महत्त्वाचं म्हणजे, महापौर पदाचे आरक्षण चक्राकार पद्धतीने ठरवले जाणार असून, २०११ च्या जनगणनेच्या आधारे आरक्षण निश्चित होणार आहे. यात महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असणार असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी ‘धडाकेबाज’ महापौर कोण?

पुणे शहरात वाहतूक, पाणीपुरवठा, प्रदूषण, स्मार्ट सिटी, रस्ते आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस निर्णय घेणारा, प्रशासनावर वचक ठेवणारा आणि पुण्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा महापौर कोण ठरणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

The post पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी ‘धडाकेबाज’ महापौर कोण? appeared first on Grahak Jagruti News .

पुणे महापालिका रणसंग्राम : प्रचाराचा आज पडदा, बंडखोरी-प्रतिष्ठेची लढाई शिगेला…
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस…पुणे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आता निर्णायक वळणावर येऊन ठेपली असून प्रचाराचा जोरदार धडाका अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. गेले अनेक दिवस शहरातील प्रत्येक प्रभागात मेळावे, झंझावाती रॅली, कोपरा सभा आणि ध्वनीक्षेपकांचा गजर सुरू होता. मात्र, मंगळवार (दि. १३) सायंकाळी साडेपाच वाजता जाहीर प्रचाराची तोफ थंडावणार असून, त्यानंतर पुणेकरांचा कौल ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

यंदाची पुणे महापालिका निवडणूक केवळ सत्तेची लढाई न राहता प्रतिष्ठा, बंडखोरी आणि बदललेल्या राजकीय समीकरणांची कसोटी ठरत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

१५ जानेवारीला मतदान, १,१४९ उमेदवार रिंगणात

येत्या गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून पुणे महापालिकेच्या १६३ नगरसेवक पदांसाठी (दोन बिनविरोध) निवडणूक होत आहे. विशेष बाब म्हणजे तब्बल १ हजार १४९ उमेदवार मतदारांचा कौल मिळवण्यासाठी मैदानात उतरले आहेत. युती-आघाड्यांचे राजकारण, गल्लीबोळात सत्तांतराचे प्रतिबिंब. या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे नव्या युती-आघाड्यांचा उदय. राज्यातील राजकीय स्थित्यंतरांचा थेट परिणाम पुण्याच्या प्रभागनिहाय राजकारणावर दिसून येत आहे. राज्यात सत्तेत एकत्र असलेले भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष मात्र पुणे महापालिकेत एकमेकांविरोधात उभे ठाकलेले पाहायला मिळत आहेत.

अजित पवारांचे पुण्यावर लक्ष…

राष्ट्रवादी एकत्र

उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेवर विशेष लक्ष केंद्रीत करत पुण्यात तळ ठोकला आहे. यंदा पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवत असल्याने राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची बनली आहेत.

भाजप स्वबळावर, विरोधकांची नवी आघाडी

भाजपने कोणालाही सोबत न घेता स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेत जोरदार प्रचार केला आहे.

तर दुसरीकडे काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे हे तीन पक्ष एकत्र येऊन मैदानात उतरले असून, ही नवी आघाडी मतदारांच्या दृष्टीने चर्चेचा विषय ठरली आहे.

उमेदवारीवरून बंडखोरी, कार्यकर्त्यांचा उद्रेक…

सर्वच पक्षांत उमेदवारी वाटपावरून अंतर्गत धुसफूस उफाळून आली. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्यांना संधी दिल्याचा आरोप उघडपणे करण्यात आला.

यामुळे अनेक प्रभागांत स्वकीय बंडखोरीचे आव्हान पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसमोर उभे राहिले असून, हीच बंडखोरी निकालात निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पळवापळवीने गणिते बदलली

निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी-विरोधी गटांमध्ये कार्यकर्त्यांची पळवापळवी शिगेला पोहोचली होती. वजनदार कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी चढाओढ लागल्याने प्रभागनिहाय गणिते पूर्णतः बदलली आहेत.

आता प्रचार थांबणार, पण राजकीय धडका मात्र मतदानाच्या दिवशी आणि निकालात उमटणार, हे निश्चित!

The post पुणे महापालिका रणसंग्राम : प्रचाराचा आज पडदा, बंडखोरी-प्रतिष्ठेची लढाई शिगेला… appeared first on Grahak Jagruti News .

“पुण्यात भाजपची गुप्त रणनीती उघड! उमेदवारांना फोन वरून ए-बी फॉर्म, कार्यकर्त्यांत प्रचंड संभ्रम”
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस, गणेश तुम्मा..

भाजपच्या उमेदवार यादी जाहीर होण्यावरून गेल्या काही दिवसांपासून तारखांचा लपंडाव सुरू होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाही अधिकृत यादी जाहीर न झाल्याने इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीला लागला होता. मात्र आता भाजपकडून अधिकृत यादी न जाहीर करता थेट फोनवरून उमेदवारी निश्चित करण्याची खेळी खेळली जात असल्याचे समोर आले आहे.

बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने ही गुप्त रणनीती आखली..

ज्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे त्यांना थेट पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून फोन करून अर्ज भरण्याचा निरोप दिला जात आहे. त्याचबरोबर संबंधित उमेदवारांना पक्षाचे ए आणि बी फॉर्मही गुप्तपणे पोहोचवले जात आहेत.

आतापर्यंत गणेश बिडकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक, श्रीनाथ भिमाले यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांना भाजपकडून ए–बी फॉर्म देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसल्याने नेमकी उमेदवारी कोणाला मिळाली, याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

दरम्यान, भाजपमधून पहिला अधिकृत उमेदवारी अर्ज गणेश बिडकर यांनी दाखल केला असून, त्यांच्यासोबत सायली वांजळे, माधुरी सहस्त्रबुद्धे, योगेश मुळीक यांनीही अर्ज दाखल केले आहेत. काही नेत्यांना ए–बी फॉर्म देण्यात आले असले तरी त्यांच्या नावांची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

अशातच पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने दि. 29 डिसेंबर रोजी पुण्यातील काही प्रभागांची अधिकृत उमेदवार यादी जाहीर केली आहे.

अधिकृत उमेदवार यादी जाहीर केली आहे.

भाजपची जाहीर उमेदवार यादी :

प्रभाग 9 : सुस – बाणेर – पाषाण

अमोल बालवडकर, गणेश कळमकर, मयुरी राहुल कोकाटे, रोहिणी चिमटे

प्रभाग 10 : बावधन – भुसारी

किरण दगडे, दिलीप वेडे, अल्पना गणेश वर्पे, रूपाली सचिन पवार

प्रभाग 11 : रामबाग कॉलनी – शिवतीर्थनगर

अजय मारणे, शर्मिला नितीन शिंदे, अभिजित राऊत

प्रभाग 29 : डेक्कन जिमखाना – हॅप्पी कॉलनी

मिताली कुलदीप साळवेकर, पुनीत जोशी, सुनील पांडे, मंजुश्री खर्डेकर

प्रभाग 30 : कर्वेनगर – हिंगणे होम कॉलनी

राजाभाऊ बराटे, सुशील मेंगडे, तेजश्री महेश पवळे, रेश्मा संतोष बराटे

प्रभाग 31 : मयूर कॉलनी – कोथरूड

पृथ्वीराज सुतार, निलेश कोंढाळकर, वासंती जाधव, हर्षाली माथवड

प्रभाग 32 : वारजे – पॉप्युलरनगर

भारतभूषण बराटे, सायली वांजळे, सचिन दोडके, हर्षदा शंतनु भोसले

प्रभाग 33 : शिवणे – खडकवासला – धायरी भाग

सुभाष नाणेकर, किशोर पोकळे, ह.भ.प. ममता सचिन दांगट, धनश्री दत्ता कोल्हे

प्रभाग 34 : नर्हे – वडगाव बुद्रूक – धायरी

हरिदास चरवड, राजाभाऊ लायगुडे, जयश्री भूमकर, कोमल नवले

प्रभाग 35 : सनसिटी – माणिकबाग

ज्योती गोसावी, श्रीकांत जगताप, सचिन मोरे, मंजुषा नागपुरे

The post “पुण्यात भाजपची गुप्त रणनीती उघड! उमेदवारांना फोन वरून ए-बी फॉर्म, कार्यकर्त्यांत प्रचंड संभ्रम” appeared first on Grahak Jagruti News .

पुणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव २०२५ शांततेत व सुरळीत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाने कसली कंबर…..
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस, गणेश तुम्मा

पुणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव २०२५ शांततेत व सुरळीत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांनी शनिवारी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. तसेच परिमंडळ ५ चे उपायुक्त श्री. राजकुमार शिंदे यांनी वाहतूक नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन, आपत्कालीन परिस्थिती हाताळणी तसेच आपत्ती व्यवस्थापन याबाबत नियोजन सादर केले. त्याचबरोबर नागरिक व मंडळांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

पुणे शहर पोलीसांतर्फे गणेश उत्सव २०२५ दरम्यान गणेश मंडळात येणा-या गणेश भाविकांच्या सुरक्षेकरीता व पोलीस बंदोबस्त यांचे चांगले नियोजन करीता यावे यासाठी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा यांनी स्वतः इतर पोलीस अधिक-यांसोबत पायी फिरून शहरातील मध्यभागातील मानाच्या व महत्वाच्या तसेच मध्या भागातील गणेश मंडळांना भेट दिली व गणेश मंडळांचे मंडप, वाहतुक आणि बंदोबस्त याची पाहणी केली.

गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी, गणेशोत्सव शांततेत पार पडावा याकरीता गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, यांना मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी गणेशोत्सव साजरा करणे बाबत मार्गदर्शनपर सुचना दिल्या. पोलीस अधिका-यांना गर्दी व वाहतुकीच्या नियोजनाबाबत सुचना दिल्या. तसेच गणेश मंडळांना भेटी देऊन गणेश उत्सव २०२५ च्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.

उपायुक्त परिमंडळ ५ चे श्री राजकुमार शिंदे यांच्या वतीने नियोजन व आपत्ती व्यवस्थापन या विषयावर दिनांक २३/०८/२०२५ रोजी ११/०० वा. जांभूळकर गार्डन, वानवडी, पुणे येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

पुणे शहर गणेशोत्सवाच्या अनुषंगाने गर्दी नियोजन व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन केले. दिनांक २७/०८/२०२५ ते ०६/०९/२०२५ रोजीचे दरम्यान आगामी गणेशोत्सव सर्वत्र साजरा होणार आहे. गणेशोत्सव काळामध्ये होणाया गर्दीचे व्यवस्थापन व नियोजन करण्यासाठी पुणे शहरातील पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, स्वयंसेवक व गणेश मंडळांचे कार्यकर्ते नागरिक यांचे प्रशिक्षण घेण्याबाबत पोलीस आयुक्त यांचे आदेश प्राप्त झाले होते. त्या अनुषंगाने परिमंडळ ५ कार्यक्षेत्रामध्ये गणेशोत्सव बंदोबस्त सुरळीत पार पाडण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

सदर प्रशिक्षक रिसीलेंट इंडिया, नाशिक, जिल्हा नाशिक श्री. राजीव चौबे, यांनी यापूर्वी आषाढी व

कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर येथील गर्दीचे तसेच नाशिक येथील कुंभमेळ्यातील गर्दीचे प्रशिक्षण

पोलीसांना दिलेले आहे. परिमंडळ ५ मधील १०० पोलीस अधिकारी, ५०० पोलीस अंमलदार, ४०० स्वयंसेवक व

गणेश मंडळांचे कार्यकर्ते नागरिक यांना गर्दी नियोजन व आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले.

सदर प्रशिक्षणा दरम्यान मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे यांनी उपस्थितांना कोणत्याही स्वरुपाच्या गर्दीचे व्यवस्थापन करत असताना लोकांचा जाण्याचा व येण्याचा मार्ग वेगळा असला पाहिजे, कुठेही क्रॉसफ्लो होवु नये पोलीसांनी दिलेल्या सुचनाचे तंतोतंत पालन केले पाहिजे, गणेश मंडळांकडे गर्दी नियंत्रणासाठी रस्सी, बॅरिकेड व स्वयंसेवक असले पाहिजेत, असे आवाहन त्यांचे मार्गदर्शनात केले.

The post पुणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव २०२५ शांततेत व सुरळीत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाने कसली कंबर….. appeared first on Grahak Jagruti News .

राज्यातील पोलीस दलात मोठे बदल गृह विभागाच्या आदेशानुसार 83 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या…
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना गृह विभागाने राज्य पोलीस दलात मोठे बदल करण्यात आले आहेत, राज्याच्या गृह विभागाने भारतीय पोलिस सेवा व राज्य पोलिस सेवेतील ८३ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या केल्या आहेत.पुणे शहरच्या उपयुक्त स्मार्तना पाटील यांची प्राचार्य (पोलिस प्रशिक्षण केंद्र, खंडळा) तसेच वाहतूक विभागाचे उपायुक्त अमोल झेंडे यांची ही बदली करण्यात आली..

सोलापूर ग्रामीणच्या तत्कालीन पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांची बदली पुण्यातील राज्य राखीव पोलिस बल क्र. एकच्या समादेशकपदी झाली आहे. याशिवाय अमोल तांबे यांची बदली लातूरच्या पोलिस अधीक्षकपदी झाली आहे. अश्विनी सानप यांच्याकडे पुणे लोहमार्गची जबाबदारी देण्यात आली आहे.

बदली झालेले अधिकारी व पदस्थापना….

तेजस्विनी सातपुते : एसआरपीएफ बल क्र. एक (पुणे)

अमोल तांबे : पोलिस अधीक्षक (लातूर)

अश्विनी सानप : लोहमार्ग पोलिस अधीक्षक (पुणे)

संजय वाय. जाधव : एसआरपीएफ बल क्र. ११ (नवी मुंबई)

शीतल झगडे : पोलिस अधीक्षक (दहशतवाद विरोधी पथक, मुंबई)

निलेश मोरे : अप्पर पोलिस अधीक्षक (भंडारा)

चंद्रकांत खांडवी : पोलिस अधीक्षक (पोलिस प्रशिक्षण केंद्र, धुळे)

मनीषा दुबले : पोलिस अधीक्षक (शस्त्र निरीक्षण शाखा, पुणे)

वैभव कलबुर्गे : अप्पर पोलिस अधीक्षक (अहिल्यानगर)

प्रदीप जाधव : पोलिस अधीक्षक (गुन्हे अन्वेषण विभाग, अमरावती)

गोकुळ राज जी. : अप्पर पोलिस अधीक्षक (गडचिरोली)

दीपक देवराज : पोलिस अधीक्षक (नागरी हक्क संरक्षण, ठाणे)

मनोज पाटील : पोलिस अधीक्षक (पोलिस प्रशिक्षण केंद्र, नागपूर)

जयश्री गायकवाड : पोलिस उपायुक्त (राज्य गुप्तवार्ता विभाग, छत्रपती संभाजीनगर)

प्रशांत खैरे : अप्पर पोलिस अधीक्षक (महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक)

निकेश खाटमोडे पाटील : पोलिस अधीक्षक (अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्स)

अण्णासाहेब मारूती जाधव : अप्पर पोलिस अधीक्षक (गडहिंग्लज)

अजय देवरे : अप्पर पोलिस अधीक्षक (धुळे)

यशवंत काळे : पोलिस अधीक्षक (गुन्हे अन्वेषण विभाग, छत्रपती संभाजीनगर)

ईश्वर कातकडे : अप्पर पोलिस अधीक्षक (चंद्रपूर)

रीना जनबंधू : पोलिस उपायुक्त (राज्य गुप्तवार्ता विभाग, नागपूर)

बाबुराव महामुनी : अप्पर पोलिस अधीक्षक (रत्नागिरी)

अविनाश बारगळ : पोलिस अधीक्षक (पोलिस प्रशिक्षण केंद्र, लातूर)

माधुरी कांगणे : पोलिस अधीक्षक (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर)

सुनील लांजेवार : पोलिस अधीक्षक (गुन्हे अन्वेषण विभाग, कोल्हापूर)

अनिकेत भारती : पोलिस उपायुक्त (राज्य गुप्तवार्ता विभाग, नाशिक)

जयश्री देसाई : प्राचार्य (राज्य राखीव पोलिस बल, प्रशिक्षण केंद्र नानवीज-दौंड)

अशोक थोरात : समादेशक (आयआरबी राज्य राखीव पोलिस बल क्र. ४, चंद्रपूर)

लक्ष्मीकांत पाटील : पालिस अधीक्षक (नागरी हक्क संरक्षण, नांदेड)

सदाशिव वाघमारे : अप्पर पोलिस अधीक्षक (वर्धा)

दिगंबर प्रधान : पालिस अधीक्षक (नागरी हक्क संरक्षण, नागपूर)

अजित बोऱ्हाडे : पोलिस उपायुक्त (बृहन्मुंबई)

निलेश अष्टेकर : पोलिस उपायुक्त (बृहन्मुंबई)

वसंत जाधव : पोलिस उपायुक्त (बृहन्मुंबई)

पवन बनसोड : पोलिस उपायुक्त (ठाणे शहर)

विजय पवार : पोलिस उपायुक्त (बृहन्मुंबई)

महेंद्र पंडित : पोलिस उपायुक्त (बृहन्मुंबई)

तुषार पाटील : पालिस उपायुक्त (बृहन्मुंबई)

सुनील लोखंडे : पोलिस उपायुक्त (बृहन्मुंबई)

स्मिता पाटील : पोलिस उपायुक्त (राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई)

श्याम घुगे : पोलिस उपायुक्त (अमरावती शहर)

विनायक ढाकणे : पोलिस उपायुक्त (राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई)

कल्पना बारवकर : अप्पर पोलिस अधीक्षक (सांगली)

नितीन पवार : प्राचार्य (पोलिस प्रशिक्षण केंद्र, मरोळ, मुंबई)

सुनील भारद्वाज : पोलिस अधीक्षक (मुख्यालय, महामार्ग सुरक्षा, मुंबई)

प्रज्ञा जेढे : पोलिस उपायुक्त (मध्य रेल्वे, बृहन्मुंबई)

समाधान पवार : पोलिस अधीक्षक (अनुसुचित जाती व जमाती आयोग, मुंबई)

अशोक वीरकर : पोलिस उपायुक्त (मिरा-भाईंदर, वसई-विरार)

एम. एम. मकानदार : पोलिस अधीक्षक (अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्स, पुणे)

संदीप डोईफोडे : पोलिस उपायुक्त (मिरा-भाईंदर, वसई-विरार)

अविनाश अंबुरे : समादेशक (एसआरपीएफ क्र. ८, मुंबई)

जयंत बजबळे : सहायक पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था, मुंबई)

राजलक्ष्मी शिवणकर : पोलिस उपायुक्त (पुणे शहर)

पंकज अतुलकर : पोलिस उपायुक्त (छत्रपती संभाजीनगर)

कृषिकेश रावले : पोलिस उपायुक्त (पुणे शहर)

स्मार्तना पाटील : प्राचार्य (पोलिस प्रशिक्षण केंद्र, खंडळा)

अमोल झेंडे : समादेशक (एसआरपीएफ गट क्र. ७, दौंड)

श्वेता खेडकर : पोलिस उपायुक्त (पिंपरी चिंचवड)

रत्नाकर नवले : पोलिस अधीक्षक (नागरी हक्क संरक्षण, अमरावती)

स्वप्ना गोरे : समादेशक (एसआरपीएफ बल गट क्र. २, पुणे)

विजय कबाडे : पोलिस उपायुक्त (नागपूर शहर)

सागर कवडे : पोलिस अधीक्षक (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर)

नित्यानंद झा : पोलिस उपायुक्त (नागपूर शहर)

अर्चना दत्ता पाटील : अप्पर पोलिस अधीक्षक (भोकर, नांदेड)

किशोर काळे : पोलिस उपायुक्त (नागपूर शहर)

गीता चव्हाण : पोलिस अधीक्षक (महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक)

यागेश चव्हाण : पोलिस उपायुक्त (नाशिक शहर)

खंडेराव धरणे : अप्पर पोलिस अधीक्षक (हिंगोली)

भारत तांगडे : पोलिस अधीक्षक (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक)

प्रशांत बच्छाव : पोलिस अधीक्षक (नागरी हक्क संरक्षण, कोल्हापूर)

शर्मिला घार्गे : पोलिस उपायुक्त (छत्रपती संभाजीनगर)

सिंगा रेड्डी ऋषिकेश रेड्डी : पोलिस उपायुक्त (नागपूर)

शिलवंत ढवळे : पोलिस अधीक्षक (मुख्यमंत्री सुरक्षा, विशेष सुरक्षा विभाग, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई)

संदीप आटोळे : पोलिस उपायुक्त (पिंपरी चिंचवड)

अश्विनी पी. पाटील : पोलिस उपायुक्त (सोलापूर शहर)

गौहर हसन : पोलिस उपायुक्त (सोलापूर शहर)

दीपाली काळे : समादेशक (राज्य राखीव पोलिस बल, गट क्र. १०, सोलापूर)

अभय डोंगरे : अप्पर पोलिस अधीक्षक (गोंदिया)

सागर पाटील : पोलिस अधीक्षक (आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई)

सुनिता साळुंखे ठाकरे : पोलिस उपायुक्त (पश्चिम रेल्वे, मुंबई)

सोमय मुंडे : पोलिस उपायुक्त (सोलापूर शहर)

भाग्यश्री नवटके : समादेशक (आयआरबी-२,

The post राज्यातील पोलीस दलात मोठे बदल गृह विभागाच्या आदेशानुसार 83 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या… appeared first on Grahak Jagruti News .